इन्टिमेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इन्टिमेट

इन्टिमेट
लेखक व. पु. काळे
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार कथासंग्रह
प्रकाशन संस्था मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रथमावृत्ती २५ मार्च १९८०
चालू आवृत्ती डिसेंबर २००६
मुखपृष्ठकार चंद्रमोहन कुलकर्णी
विषय कथासंग्रह
पृष्ठसंख्या १२३
आय.एस.बी.एन. ८१-७७६६-३१९-४

वपुंच्या कथांमधील जग हे आपल्या अवतीभवतीचेच असते. किंबहुना त्यात कोठे ना कोठे आपण असतोच. परंतु जे आपल्या लक्षात आलेले नसते आणि लक्ष जाऊनही कळलेले नसते ते वपुंनी मार्मिकपणे टिपलेले असते आणि त्यावर मिष्किलपणे शब्दांकन केलेले असते. त्याहून मत्सरी मंडळींचे ‘दि लासा मंडळ’ सारख्या अफलातून कल्पना वाचकांसमोर देतात. त्यातून असे अचूल लिहून शकणाऱ्यांबद्दलही मत्सर वाटू लागतो.

संवादातून कथा फुलविणे ही तर वपुंची खासियतच. त्यामुळेच तर वपुंच्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्याश्या वाटतात. अशाच वपुंच्या नऊ कथा ह्या संग्रहात आल्या आहेत. ज्यात “मोदी ॲंड मोदी” सारखी वाचकांनी उचलून धरलेली कथाही आहे.

या संग्रहातील कथा

  1. “फ्रॉम कमिशनर्स डेस्क”
  2. जावडेकर, बोला..
  3. केव्हाही बोलवा
  4. ड्रीम सिक्वेन्स
  5. बिरबलाची आणीबाणी
  6. प्रोव्हिजन
  7. मोदी ॲंन्ड मोदी
  8. ‘जे’ फॉर
  9. इन्टिमेट