इंडिया अनटच्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


भारतातील जातीयता आणि अस्पृश्यता अजूनही वेगवेगळ्या स्वरूपात कशी शिल्लक आहे याचा आत्ता पर्यंतचा डॉक्यूमेंटरी स्वरूपात घेण्यात आलेला सर्वात मोठा आणि वस्तुनिष्ठ आढावा म्हणजे स्टालीन के. यांची 'इंडिया अनटच्ड' हि डॉक्यूमेंटरी.[१] [२]ह्या डॉक्यूमेंटरीचे अंश अमीर खान यांच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमातून दाखवले गेले.

वैद्यकीय क्षेत्रातील जातीयता आणि अस्पृश्यतेचे अस्तीत्व[संपादन]

खरेतर सर्व मानवांचे रक्त सारखे असते त्या शिवाय सर्व भारतीय जेनेटीकली एकाच वंशाचे आहेत ह्याचे वैज्ञानीक शिक्षण घेतलेल्या डॉक्टर लोकांनी जातीय विषमतेच्या आणि अस्पृश्यतेच्या जोखडातून भारतीय समाजास मुक्त करण्यास पुढाकार घ्यावयास हवा. मागासवर्गीय डॉक्टरांनाच त्यांच्या व्यावसायीक कारकिर्दीत इतर सहकारी डॉक्टरांकडूनसुद्धा कशी विषमतेची वागणून दिली जाते याचे विदारक चित्रण या डॉक्युमेंटरीत आले आहे. [३] दुसरीकडे एका राज्याच्या व्यवसायाने डॉक्टर असलेल्या स्त्री मंत्रीणीचे धार्मीक विषमता पसरवण्याचे काम हि जातीयता आणि धर्मांधतेत ह्या व्यवसायातील लोकांचे खरे योगदानाचे स्वरूप नजरे आड होऊ देत नाही. या बाबत वैद्यकीय शिक्षकांची आणि व्यावसायिकांची जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे.[४]
संदर्भयादी[संपादन]