इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक
Appearance
(इंडियन पोस्ट पेमेंट बॅंक या पानावरून पुनर्निर्देशित)
इंडियन पोस्ट पेमेंट बँकही भारत सरकारद्वारे चालविण्यात येणारी बँकिंग सेवा आहे. टपाल खात्यातर्फे ही सेवा चालवली जाते. याची सुरुवात १ सप्टेंबर २०१८ रोजी झाली. धन अंतरण (मनी ट्रांसफर), थेट लाभ हस्तांतरण, देयक भरणा, मायक्रो एटीएम आरटीजीएस आदी सुविधा या बँकेतर्फे देण्यात येणार आहे. याचे एक ॲ पही आहे.
भारत देशातील सुमारे ६५० शाखा व ३२५० ॲक्सेस पॉइंट्स याचे माध्यमातून या बँकेचे कामकाज प्रथम चरणात सुरू होत आहे. या बँकेत खाते उघडण्यास 'इ-केवायसी' या प्रक्रियेचा अवलंब केल्या जऊ शकतो.याचे खात्यातील रकमेची महत्तम धारण क्षमता रु.१,००,०००/- इतकी आहे.