आशुतोष कुंभकोणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आशुतोष कुंभकोणी हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. जून २०१७ मध्ये कुंभकोणी यांची नेमणूक झाली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अडीच वर्षांच्या कालावधीत एकापाठोपाठ एक अशा चारजणांना महाधिवक्तापदी नेमले गेले.

फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यावर नागपूर येथील ज्येष्ठ वकील सुनील मनोहर यांची नियुक्ती या पदावर झाली. त्यांनी काही महिन्यांतच वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा दिल्यावर नागपूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांची नियुक्ती झाली. त्यांनी स्वतंत्र विदर्भाबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे ते वादग्रस्त ठरले आणि त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पुन्हा नागपूर येथीलच ज्येष्ठ वकील रोहित देव यांची नियुक्ती झाली. पण त्यांची उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यावर आता कुंभकोणी यांची महाभिवक्तेपदी नेमणूक झाली आहे.