आशिल ल्योन्स विक्तोर शार्ल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आशिल ल्योन्स विक्तोर शार्ल

आशिल ल्योन्स विक्तोर शार्ल, ब्रॉईयाचा ३ रा ड्यूक (फ्रेंच: Achille-Léonce-Victor-Charles, 3rd duc de Broglie; उच्चार: आशिल ल्योन्स विक्तोर शार्ल, द्यूक द ब्रॉईय ;), अर्थात विक्तोर द ब्रॉईय (फ्रेंच: Victor de Broglie ;) (१८ नोव्हेंबर, इ.स. १७८५ - २५ जानेवारी, इ.स. १८७०) हा फ्रेंच राजकारणी व मुत्सद्दी होता. फ्रान्साच्या जुलै राजतंत्राच्या काळात 'परिषदेचा अध्यक्ष', या पंतप्रधानपदाच्या तोलाच्या पदावर तो दोनदा अधिकारारूढ झाला. परिषदेचा ९वा अध्यक्ष म्हणून त्याने ऑगस्ट, इ.स. १८३० ते नोव्हेंबर, इ.स. १८३० या काळात कारभार सांभाळला; तर मार्च, इ.स. १८३५ ते फेब्रुवारी, इ.स. १८३६ या काळात परिषदेचा १६वा अध्यक्ष म्हणून पदाधिकार सांभाळला.

बाह्य दुवे[संपादन]

  • "विक्तोर द ब्रॉईय" (फ्रेंच भाषेत). Archived from the original on 2007-10-05. 2011-07-28 रोजी पाहिले.
  • ल्योन्स विक्तोर, द्यूक द ब्रॉईय. एन्सायक्लोपीडिया-ब्रिटानिका (११वी आवृत्ती) (फ्रेंच भाषेत). Archived from the original on 2011-06-04. 2011-07-28 रोजी पाहिले.