आल्बेर्तो अस्कारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आल्बेर्तो अस्कारी (१३ जुलै, इ.स. १९१८:मिलान, इटली - २६ मे, इ.स. १९५५:ऑटोड्रोमो नॅझियोनाल, मोंझा, इटली) हा इटलीचा फॉर्म्युला वन चालक होता. हा मोटरसायकल शर्यतीतही भाग घेत असे.

आल्बेर्तोची वडील ॲंतोनियो अस्कारी हे सुद्धा रेस कार चालक होते. ते १९२५ फ्रांस ग्रांप्री शर्यतीत झालेल्या अपघातात मृत्यू पावले. त्यांनी आपल्या मुलांना आपला व्यवसाय न पत्करण्यास बजावले होते तरीही आल्बेर्तोने तेच केले. सहसा अतिशय सुरक्षितपणे कार चालविणारा आल्बेर्तो आपल्या वडिलांच्याच वयाचा असताना त्यांना झालेल्या अपघाता सारख्यात अपघातात मृत्यू पावला.