आल्डस हक्सली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आल्डस हक्सली (इ.स. १८९४ - इ.स. १९६३) हे एक इंग्लिश लेखक व तत्त्वज्ञ होते. १९३२ मध्ये प्रकाशित झालेल्या ब्रेव्ह न्यू वर्ल्ड या त्यांच्या कादंबरीसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यात त्यांनी आधुनिक यंत्राधिष्ठित सामाजातील मानवी समस्यांचा मागोवा घेतला आहे. या शिवाय देखील हक्सली यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. हक्सली इंग्लंडमधील प्रसिद्ध घराणे होते. त्यांचे आजोबा टी.एच. हक्सली हे उत्क्रांतीवादाचे एक डार्विनचे समकालीन समर्थक होते, वडील लेनर्ड हक्सली हे ग्रीक भाषेचे विद्वान होते, बंधू जुलीयन हक्सली प्राणीशास्त्राचे अभ्यासक होते, तर आई जुलिया हक्सली ही शिक्षणतज्ञ होती.