आर्तुरो तोस्कानिनी
Jump to navigation
Jump to search
आर्तुरो तोस्कानिनी (इटालियन: Arturo Toscanini; २५ मार्च १८६७, पार्मा − १६ जानेवारी १९५७, न्यू यॉर्क शहर) हा एक इटालियन संगीतकार होता. विसाव्या शतकातील सर्वोत्तम संगीतकारांपैकी एक मानला जात असलेल्या तोस्कानिनीने आपली कारकीर्द मिलानमध्ये सुरू केली. लवकरच तो प्रसिद्धीच्या वाटेवर चालू लागला. इटलीचा फॅसिस्ट हुकुमशहा बेनितो मुसोलिनीने तोस्कानिनीचा जगातील सर्वश्रेष्ठ संगीतकार असा गौरव केला होता. दुसऱ्या महायुद्धापूर्वी तोस्कानिनीने अमेरिकेमध्ये पलायन केले व तो न्यू यॉर्क शहरामध्ये स्थायिक झाला. येथे त्याने रेडियोवर संगीत देण्यास सुरुवात केली.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत