आरएनए

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दोन पेडांचे आरएनए

आरएनए हा एक जीवसृष्टीतील महत्त्वाचा रेणु आहे.[१]आरंभी हे सहकारी चक्रातले रेणु एकाच पद्धतीचे, एकाच घराण्याचे, "आरएनए " वर्गातले होते. हे आरएनए रेणु पुनरुत्पादनासाठी जरूर असलेली माहिती पुरवत होते, आणि पुनरुत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी आवश्यक असलेली प्रेरणाही देत होते. पण एकाच वर्गातील रेणूंना ही दोन्ही कामे तितक्या सफ़ाईनी जमत नव्हती. तेव्हां उत्क्रान्तीच्या दुसऱ्या टप्प्यात या दोन भूमिकांची श्रमविभागणी होवून एक नवीनच सहकार चक्र निर्माण झाले. माहिती संभाळण्याची, सूचकाची भूमिका आरएनएच्या दादांनी, डीएनएनी स्वीकारली, तर रासयनिक प्रक्रियांचा वेग वाढवायचे, प्रेरकाचे काम प्रथिन (प्रोटीन्स) बजावायला लागले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "RNA: The Versatile Molecule". learn.genetics.utah.edu. 2022-04-10 रोजी पाहिले.