Jump to content

प्राथमिक खुला देकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आय.पी.ओ. या पानावरून पुनर्निर्देशित)

प्राथमिक खुला देकार (प्राथमिक खुली भागविक्री) किंवा आय.पी.ओ. (English: IPO/Initial Public Offering) हा खासगी किंवा भागीदारीतील कंपन्यामधील समभाग पहिल्यांदा जनतेस विकत घेण्यासाठीच प्रस्ताव किंवा देकार असतो. याद्वारे कंपनी आपले सगळे समभाग विकू शकते किंवा काही भाग राखीव ठेवून उरलेली मालकी जनतेस समभागांद्वारे विकत देते.

अशा देकारानंतरही कंपनी अधिक समभाग जनतेस विकू शकते परंतु त्यास प्राथमिक देकार म्हणता येत नाही.

असे देकार सहसा प्राथमिक बाजारात केले जातात.