आयसीडी-१०
आयसीडी-१० ही व्याधी व संबंधित आरोग्य समस्यांच्या आंतरराष्ट्रीय सांख्यिकीय वर्गीकरणाची, जागतिक आरोग्य संघटनेच्या वैद्यकीय वर्गीकरणाची दहावी आवृत्ती आहे. व्याधी, लक्षणे व चिन्हे, विकृत बाबी, तक्रारी, सामाजिक परिस्थिती आणि व्याधी वा इजांची बाह्य कारणे या सर्वांसाठी या वर्गीकरणात संकेत आहेत. संकेत संच १४,४००हून अधिक विविध संकेत सामावून घेतो आणि अनेक नवीन निदानांवर लक्ष ठेवण्याची परवानगी देतो. पर्यायी उपवर्गीकरणे वापरून हे संकेत १६,०००हून अधिक होतात. वेगवेगळ्या माहिती क्षेत्रांत भरणे अपेक्षित असलेले संकेत वापरून व सुलभ बहुअक्षीय वृत्तीने आयसीडीचा तपशिलाचा स्तर वाढविता येतो.
जागतिक आरोग्य संघटनेने प्रशिक्षणासहित संपूर्ण वर्गीकरण महाजालावर उपलब्ध करून दिलेले आहे. आयसीडी-१० चे काम इ.स. १९८३ मध्ये सुरू झाले आणि १९९२ मध्ये संपले.
यादी
[संपादन]या विभागात आयसीडी-१० संकेतांची यादी दिलेली आहे.[१]
प्रकरण | संच | शीर्षक |
---|---|---|
१ | A00-B99 | विशिष्ट संक्रामक व परजीविक आजार |
२ | C00-D48 | नववृद्धी |
३ | D50-D89 | रक्ताचे व रक्त-निर्मात्या अवयवांचे आजार आणि प्रतिरक्षा तंत्राचे विशिष्ट आजार |
४ | E00-E90 | अंतःस्रावी, पोषणीय व चयापचयी आजार |
५ | F00-F99 | मानसिक व वर्तनविषयक आजार |
६ | G00-G99 | तंत्रिका संस्थेचे आजार |
७ | H00-H59 | कानाचे व कर्णमूल प्रवर्धाचे आजार |
८ | H60-695 | डोळ्याचे व संलग्न रचनांचे आजार |
९ | I00-I99 | अभिसरण संस्थेचे आजार |
१० | J00-J99 | श्वसनसंस्थेचे आजार |
११ | K00-K93 | पचनसंस्थेचे आजार |
१२ | L00-L99 | त्वचेचे आणि अधस्त्वचीय ऊतींचे आजार |
१३ | M00-M99 | स्नायूकंकाली संस्था आणि संयोजी ऊतींचे आजार |
१४ | N00-N99 | जननमूत्रीय संस्थेचे आजार |
१५ | O00-O99 | गरोदरपणा, अपत्यजन्म आणि प्रसवोत्तर काल |
१६ | P00-P96 | जन्मपरिकालीन अवधीत उद्भवणाऱ्या विशिष्ट अवस्था |
१७ | Q00-Q99 | जन्मजात कुरचना, विरुपण आणि गुणसूत्रीय व्यंगे |
१८ | R00-R99 | इतरत्र वर्गीकृत न केलेली लक्षणे, चिन्हे आणि अपसामान्य चिकित्सशास्त्रीय व प्रयोगशालीन शोधने |
१९ | S00-T98 | इजा, विषबाधा व बाह्य कारणांचे इतर विशिष्ट परिणाम |
२० | V01-Y98 | अनारोग्यता व मर्त्यता यांची बाह्य कारणे |
२१ | Z00-Z99 | आरोग्यस्थितीवर प्रभाव टाकणारे घटक आणि आरोग्यसेवांशी संपर्क |
२२ | U00-U99 | खास उद्दिष्टांसाठी संकेत |