आयपीएल सुपरनोव्हाझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आयपीएल सुपरनोव्हाझ हा बीसीसीआयद्वारे २०१८ साली सुरू केलेल्या महिला ट्वेंटी२० चॅलेंज या क्रिकेट स्पर्धेत भाग घेणारा संघ आहे.

२०१८ साली बीसीसीआयने पुरुषांच्या आयपीएल धर्तीवर महिलांची एक स्पर्धा सुरू केली. ज्यातला आयपीएल सुपरनोव्हाझ हा एक संघ होता. हरमनप्रीत कौर हिच्याकडे या संघाचे कर्णधारपद आहे. सदर संघाने २०१८ आणि २०१९ साली महिला ट्वेंटी२० चॅलेंजचे विजेतेपद पटकावले आहे.