आयपीएल ट्रेलब्लेझर्स
Appearance
आयपीएल ट्रेलब्लेझर्स हा बीसीसीआयद्वारे २०१८ साली सुरू केलेल्या महिला ट्वेंटी२० चॅलेंज या क्रिकेट स्पर्धेत भाग घेणारा संघ आहे.
२०१८ साली बीसीसीआयने पुरुषांच्या आयपीएल धर्तीवर महिलांची एक स्पर्धा सुरू केली. ज्यातला आयपीएल ट्रेलब्लेझर्स हा एक संघ होता. स्म्रिती मंधाना हिच्याकडे या संघाचे कर्णधारपद आहे. सदर संघाने २०२० साली महिला ट्वेंटी२० चॅलेंजचे विजेतेपद पटकावले आहे व सद्य विजेता संघ आहे.