भारतीय आर्थिक प्रणाली कोड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आयएफएससी कोड या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय आर्थिक प्रणाली कोड हा The Indian Financial System Code (IFS Code अथवा IFSC) हा पैसे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने खात्यात भरण्यासाठी बनवलेली पद्धती आहे. या कोडमुळे बँकेतील प्रत्येक शाखा इलेक्ट्रॉनिकली ओळखणे शक्य होते. यामुळे भारतातील दोन् प्रमुख पैसे वर्गीकरणाच्या पद्धती रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट Real Time Gross Settlement (RTGS) आणि आंतरदेशीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण National Electronic Fund Transfer (NEFT) चालवण्यास याचा उपयोग होतो. यांची यादी सर्व बँकात मिळते.

भारतीय आर्थिक प्रणाली कोड कसा असतो?[संपादन]

IFS कोड हा ११ कॅरेक्टरचा असतो. सुरुवातीचे जे ४ अक्षर असतात. ते बँकचे नाव असते, पाचवे हे नेहमी 0 (शून्य) असते.  हा एक नियंत्रण क्रमांक आहे, जो सर्व आयएफएससी कोडमध्ये समान असतो. तर शेवटच्या ६ नंबर हे बँकेचे स्थळ (location) दर्शवत असतो. त्यामुळे बँक कुठली व ब्रँच कोणती हे समजते. उदा. State Bank of India pune, Maharashtra

IFSC Code- SBIN0000333

IFSC कोड माहीत करायचा असल्यास तो आपल्या बँक ब्रँच मध्ये मिळतो, तसेच IFSC कोड का आपल्या पासबुक व चेक बुक वर देखील असतो.

स्वरूप[संपादन]

हा कोड ११ अक्षरेआकडे मिळून बनलेला आहे. यातील पहिली चार अक्षरे बँकेचा कोड आहे शेवटची अक्षरे त्या शाखेचा कोड आहे. मधले शून्य हे भविष्यातील उपयोगासाठी राखीव आहे.

हे ही पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]