आदित्य (अंतराळयान)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आदित्य Aditya.ogg उच्चार हे भारतीय अंतराळ शोध संस्थेचे सूर्याबद्दल संशोधन करणारे यान असेल. जानेवारी २००८मध्ये याच्या उड्डाणाचा आराखडा तयार करण्यात आला.[१] व नोव्हेंबर १० २००८ रोजी त्यास निश्चिती देण्यात आली.[२]

इस्रो याची रचना व बांधणी करेल.[१][३] २०१२मध्ये उड्डाण करणारे हे यान सूर्याभोवतीच्या प्रभामंडळाचा(करोना) अभ्यास करेल. यानांतर्गत करोनाग्राफ (प्रभामंडळ मोजण्याचे उपकरण)द्वारे दहा लाख सेल्शियस तपमान व १,००० किमी प्रतिसेकंद गतीचे सौरवारे असलेल्या या रविभागाचे निरीक्षण केले जाईल.[१]

साधारण ५० कोटी रुपयांचा खर्च येणारी ही मोहीम आदित्य उपग्रहाला पृथ्वीपासून ६०० किमीच्या कक्षेत चढवेल.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. १.० १.१ १.२ "ISRO planning to launch satellite to study the sun". The Hindu. 2008-01-13. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ३० जुलै २०१४ रोजी मिळविली). 2008-11-10 रोजी पाहिले. 
  2. "ISRO to develop Sun mission 'Aditya'". Zee News. 2008-11-10. 2008-11-11 रोजी पाहिले. 
  3. "After Chandrayaan-1's moon voyage, ISRO's Aditya to scout sun's surf". United News of India. 2008-11-11. 2008-11-14 रोजी पाहिले.