Jump to content

आईचा छकुला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आईचा छकुला हे १९३५ च्या सुमारास गंगूबाई हनगळ यांनी गायिलेले गाणे आहे. त्या काळात हिज मास्टर्स व्हॉइस कंपनीने या गाण्याची तबकडी काढली होती. मामा वरेरकरांनी लिहिलेल्या आणि गंगूबाई हनगळ यांनी गायिलेले हे गाणे त्या काळी महाराष्ट्राच्या घराघरांतून ऐकले जाई. त्यावेळी गंगूबाईंची मुलगी (कृष्णा हनगळ) तान्ही होती. तिला घेऊनच स्टुडियो मध्ये जावे लागे. ती दूध पिऊन झोपली की ध्वनिमुद्रण होत असे. जागी असली तर स्टाफ मधली मंडळी तिला खेळवत असत.

त्या गाण्याच्या ओळी अशा होत्या :-

आईचा छकुला, चिमुकला आईचा छकुला !

चपल सदा रुसलेला दिसला आईचा छकुला !

वाहिली राहिली माया डोळां ज्या पहाया का हळु हसला माया जिवाला लावियलेला !

कवी : मामा वरेरकर

गायिका : गंगूबाई हनगळ

चाल : मामा वरेरकरांची