आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन
Appearance
आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन ही जागतिक टेनिस, व्हीलचेअर टेनिस, बीच टेनिस इत्यादी खेळांचे नियमन करणारी संस्था आहे.त्याची स्थापना सन १९१३ मध्ये आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस फेडरेशन म्हणून झाली.त्यावेळी त्यात १२ राष्ट्रीय संघटनांचा अंतर्भाव होता. सन २०१६ मध्ये याची संलग्नता २११ राष्ट्रीय टेनिस संघटना व ६ क्षेत्रिय संघटना इतकी आहे.या संस्थेद्वारे नियमन करण्याच्या बाबीत टेनिस बाबतचे नियम लागू करणे व त्यांचे सुचालन करणे, आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे नियंत्रण करणे, खेळास प्रोत्साहन देणे तसेच, खेळातील एकात्मकता टिकवून ठेवणे इत्यादी आहे. महिला टेनिस संघटना व टेनिस व्यावसायिकांची संघटना याचे भागीदार आहेत.त्याद्वारे व्यावसायिक टेनिसचे नियमन करता येते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |