जागतिक कामगार दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आंतरराष्ट्रीय कामगार दिन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
चेन्नईतल्या मरीना किनाऱ्यावरील "श्रमाचा विजय" समूहशिल्प

आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन (अन्य नावे : मे दिन) हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; तसेच अन्य कित्येक देशांमध्येही अनधिकृतरित्या हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस प्राचीन युरोपातील वसंत दिनाच्या दिवशीच असतो.[१]

हा दिवस शिकागो मध्ये ४ मे १८८६ मध्ये घडलेल्या हेमार्केट घटनेच्या स्मरणार्थ जगभरातील समाजवादी, साम्यवादी आणि अराजकतावादी पक्ष साजरा करतात.[२]

इतिहास[संपादन]

सध्याचा 'मे दिन' हा १९ व्या शतकाच्या मध्यावर कामगार चळवळीतून सुरू झाला. ज्याची मुख्य मागणी 'आठ तासाच्या कामाच्या दिवसाची' होती.[१] या संदर्भातील पहिली मागणी २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांकडून आली तेव्हापासून हा दिवस तेथे सुट्टी म्हणून जाहीर झाला.[३] ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका आणि कॅनडातील अराजाकातावादी संघटनांनी १ मे १८८६ रोजी मोर्चे आणि धरणे यांची मालिका सुरू केली. अशाच एका मोर्चाला पांगवताना ४ मे १८८६ रोजी शिकागो मध्ये सहा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. याची परिणती पोलिसांच्या क्रूरतेविरोधातील एका मोठ्या निषेधात झाली त्यात एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉंब टाकला ज्यात ८ पोलिसांचा मृत्यू आणि ५० पोलीस जखमी झाले.[४]

या घटनेच्या स्मरणार्थ १ मे १८९० रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रेमंड लेविन याने 'दुसऱ्या आंतरराष्ट्रीय'च्या १९८९ च्या पॅॅरीस परिषदेत केली.[२] त्या परिषदेत १ मे १८९० हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले. १८९१ च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिक रित्या प्रतीवार्षिक कार्यक्रम म्हणून मान्यता देण्यात आली.[३]

हे सुद्धा पहा[संपादन]

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • "आंतरराष्ट्रीय कामगार दिनाविषयीची माहिती व संसाधने" (इंग्लिश व अन्य अनेक भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ^ a b "The Brief Origins of May Day | Industrial Workers of the World". www.iww.org (इंग्रजी भाषेत). 2018-05-01 रोजी पाहिले.
  2. ^ a b Foner, Philip Sheldon (1986-05-01). May Day: A Short History of the International Workers' Holiday, 1886-1986 (English भाषेत) (1st edition ed.). New York, NY: International Publishers. pp. ४१-४३. ISBN 9780717806249.CS1 maint: unrecognized language (link) CS1 maint: extra text (link)
  3. ^ a b Luxemburg, Rosa. "Rosa Luxemburg: What Are the Origins of May Day? (1894)". www.marxists.org. 2018-05-01 रोजी पाहिले.
  4. ^ Chicago Herald , May 5, 1886, quoted in Avrich. The Haymarket Tragedy. - P. pp. 209-210.