अ साँग ऑफ आइस ॲन्ड फायर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अ साँग ऑफ आइस ॲन्ड फायर (इंग्लिश: A Song of Ice and Fire) ही अमेरिकन लेखक जॉर्ज आर.आर. मार्टिन ह्याने लिहिलेली काल्पनिक विश्वामधील एक कादंबरी शृखंला आहे. ७ कादंबऱ्या असलेल्या ह्या शृंखलेमधील पाच पुस्तके आजवर प्रकाशित झाली असून मार्टिन सहावे पुस्तक सध्या लिहित आहे. अ गेम ऑफ थ्रोन्स हे पहिले पुस्तक १९९६ साली प्रकाशित झाले तर अ डान्स विथ ड्रॅगन्स हे पाचवे पुस्तक २०११ साली प्रकाशित झाले.

मार्टिनने रंगवलेल्या काल्पनिक विश्वामध्ये वेस्टेरोसएसोस हे दोन खंड असून कथानक अनेक पात्रांच्या दृष्टीकोनामधून सांगितले गेले आहे. ह्या कथानकामध्ये अनेक वंशावळी व त्यांची आपापसातील भांडणे व युद्धे कल्पलेली आहेत. सुरूवातीस फारशी प्रसिद्धी न मिळालेल्या अ साँग ऑफ आइस ॲन्ड फायरला वाचकांचा प्रतिसाद वाढतच गेला. ह्या शृंखलेच्या आजवर उत्तर अमेरिकेमध्ये २.४ कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत व त्याचे २० भाषांमध्ये अनुवादन केले गेले आहे. २०११ साली एच.बी.ओ. ह्या अमेरिकन वाहिनीवर गेम ऑफ थ्रोन्स नावची मालिका सुरू करण्यात आली ज्याला देखील प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली.

पुस्तके[संपादन]

# शीर्षक पाने खंड प्रकाशन तारिख
1 अ गेम ऑफ थ्रोन्स 704[१] 73 ऑगस्ट 1996[१]
2 अ क्लॅश ऑफ किंग्ज 768[२] 70 फेब्रुवारी 1999[२]
3 अ स्टॉर्म ऑफ स्वोर्ड्स 992[३] 82 नोव्हेंबर 2000[३]
4 अ फीस्ट फॉर क्रोज 753[४] 46 नोव्हेंबर 2005[४]
5 अ डान्स विथ ड्रॅगन्स 1056[५] 73 जुलै 2011[५]
6 द विंड्स ऑफ विंटर (आगामी)
7 अ ड्रीम ऑफ स्प्रिंग[६] (आगामी)

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]