अ‍ॅडेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अ‍ॅडेल
Adele someone like you - Cropped.jpg
२०११ मध्ये सिअ‍ॅटल येथे गाण्याच्या कार्यक्रमात अ‍ॅडेल
आयुष्य
जन्म मे ५, १९८८
जन्म स्थान टॉटनहॅम, उत्तर लंडन , इंग्लंड, यू.के.
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व ब्रिटिश
देश इंग्लंड
भाषा इंग्रजी
संगीत साधना
गायन प्रकार पॉप, ब्लूज
संगीत कारकीर्द
कार्य 19 , 21
पेशा गायकी
कारकिर्दीचा काळ इ..स. २००६ - आजपर्यंत
गौरव
पुरस्कार ग्रॅमी पुरस्कार
बाह्य दुवे
संकेतस्थळ

अ‍ॅडेल लॉरी ब्लू अ‍ॅडकिन्स [१] (जन्म: ५ मे, १९८८), ही अ‍ॅडेल या एकेरी नावाने सुप्रसिद्ध असलेली, इंग्रजी गायिका आणि कवयित्री आहे. एका मित्राने २००६ मध्ये मायस्पेसवर तिची गाणी टाकल्यानंतर अ‍ॅडेलला एक्स्एल रेकॉर्डिंग्जतर्फे गाणी ध्वनिमुद्रित करण्याचे कंत्राट मिळाले. त्याच्या पुढच्याच वर्षी तिला ब्रिट अवॉर्ड्‌जमधील समीक्षकांचा पुरस्कार आणि बीबीसी(साउंड ऑफ २००८) हा पुरस्कार मिळाला. तिचा पहिला अल्बम 19 २००८ मध्ये बाहेर पडला, त्याला मोठे यश मिळाले. त्या अल्बमला यू.के.मध्ये ४ पट प्लॅटिनम विक्रीचा दाखला मिळाला[२]. तिने सॅटरडे नाइट लाइव्ह या कार्यक्रमात सहभाग घेतल्यानंतर तिच्या अमेरिकेतील कारकिर्दीला २००८च्या उत्तरार्धात जोर मिळाला. अ‍ॅडेलने तिचा दुसरा अल्बम 21 २०११ मध्ये बाजारात आणला. त्याला दोन्ही समीक्षकांकडून आणि शिवाय बाजारात चांगल्या रितीने स्वीकारले गेले, आणि या आल्बममध्ये तिला तिच्या पहिल्या अल्बमपेक्षाही जास्त यश मिळाले. 21 या अल्बमला यू.के.मध्ये १४ पट प्लॅटिनम विक्री झाल्याचा दाखला मिळाला. [२], हा आल्बम अमेरिकेत १९९८ नंतरच्या इतर कोणत्याही अल्बमपेक्षा जास्त दिवस पहिल्या स्थानावर राहिला होता. [३][४]

21 या अल्बमच्या यशामुळे अ‍ॅडेलची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌जमध्ये विविध विक्रमांसाठी नोंद करण्यात आली. ती यू.के.मध्ये एका वर्षात अल्बमच्या३० लाखांपेक्षा जास्त प्रती विकणारी पहिली कलाकार बनली[५]. १९६४ मधील बीटल्सनंतर पहिल्यांदाच कुणीतरी एकाचवेळी यू.के. ऑफिशियल सिंगल्स चार्ट आणि ऑफिशियल अल्बम चार्ट यांमध्ये पहिल्या पाच स्थानांतील दोन जागा पटकवण्याची कामगिरी केली आहे. अ‍ॅडेलला २०११ मध्ये दोन आणि २०१२ मध्ये सहा ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत[६][७] [८].

संदर्भ[संपादन]

  1. Frehsée, Nicole (22 January 2009), "Meet Adele, the U.K.'s Newest Soul Star", Rolling Stone. (1070):26
  2. २.० २.१ "Certified Awards Search". British Phonographic Industry. 2011-03-01 रोजी पाहिले. 
  3. "Adele's "21" regains top spot on Billboard chart". Reuters. 26 October 2011. 2011-10-28 रोजी पाहिले. 
  4. Caulfield, Keith (26 October 2011). "Adele Back at No. 1". Billboard. 2011-10-28 रोजी पाहिले. 
  5. Kaufman, Gil (14 September 2011). "Adele, Lady Gaga, Justin Bieber Land New Guinness Records". MTV. 23 September 2011 रोजी पाहिले. 
  6. "Adele beats Lady Gaga to No 1… and matches Beatles for two top five singles and two top five albums in the same week", Daily Mail (UK), Retrieved 2011-02-21
  7. "Adele's 'Someone Like You' Tops UK Singles Chart", MTV, Retrieved 2011-02-21
  8. "ब्रिटनची गायिका एडेलेला सहा ग्रॅमी पुरस्कार", सकाळ, १४-०२-२०१२ ला पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत