अासाम रायफल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अासाम रायफल्स हे भारतातील सगळ्यात जुने निमलष्करी दल आहे.[१] या दलाची रचना १८३५मध्ये कचर लेव्ही नावाने झाली. त्यानंतर त्याचे नाव अनेकदा बदलले. अासाम फ्रंटियर पोलिस (१८८३), अासमा मिलिटरी पोलिस (१८९१) आणि ईस्टर्न बेंगाॅल ॲन्ड अासाम मिलिटरी पोलिस (१९१३) या नावांनी ओळखले जाणाऱ्या या दलास १९१३ साली अासाम रायफल्स हे नाव देण्यात आले. या दलाने अनेक कारवायांमध्ये भाग घेतला. पहिल्या महायुद्धात हे दल युरोप आणि मध्यपूर्वेत तैनात झाले तर दुसऱ्या महायुद्धात म्यानमारमध्ये जपानी सैन्याविरुद्ध लढले.

या दलात ४६ बटालियन असून त्यांत एकूण ६६,४११ सैनिक अाहेत..[२][३] हे दल भारताच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. अलीकडे या दलाने दहशतवादविरोधी कारवाया तसेच सीमा सुरक्षा कार्यात आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरी दलांना मदत करण्यात भाग घेतला आहे. याशिवाय अासाम रायफल्स दुर्गम भागात दळणवळणाची, वैद्यकीय व शैक्षणिक मदत करते. युद्धकालीन परिस्थितीमध्ये देशाच्या सीमेच्या आतल्या भागांत सुरक्षा पुरविण्यासाठी या दलाचा उपयोग होतो. २००२ सालापासून अासाम रायफल्स म्यानमार सीमेवर तैनात आहे.[४]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]