Jump to content

अहमदनगर (चिनिओट जिल्हा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अहमदनगर, चिनिओट जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

अहमदनगर नावाची दोन शहरे पाकिस्तानतल्या पश्चिम पंजाब प्रांतात आहेत. एक चिनिओट जिल्ह्यात आहे, तर दुसरे गुजराणवाला जिल्ह्यात.

अहमदनगर (चिनिओट)

[संपादन]

पूर्वी झांग जिल्ह्याचा एक तालुका असलेल्या चिनिओट जिल्ह्यात अहमदनगर नावाचे एक शहर आहे.

इतिहास

[संपादन]

इ.स. ९९७ साली सुलतान महंमद गझनीने त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेली सुलतानियत ताब्यात घेतली. पुढे इ.स. १००५ साली गझनीने काबूलजवळचे शाहीस जिंकले, आणि पाठोपाठ तत्कालीन हिंदुस्थानातला पंजाब प्रांतही जिंकला. पुढे हा प्रदेश मोगलांच्या ताब्यात गेला. सूफी पंथाच्या प्रसारामुळे इथली लोकसंख्या पूर्णपणे मुस्लिमधर्मीय झाली. शीखांच्या राज्यात जे थोडेफार हिंदू होते ते हिंदुस्थानच्या इ.स. १९४७ साली झालेल्या फाळणीनंतर भारतात गेले.