Jump to content

असघर स्तानिकझाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(असगर अफगाण या पानावरून पुनर्निर्देशित)

मोहम्मद असघर स्तानिकझाई (पश्तो: محمد اصغر ستانکزی; २२ फेब्रुवारी, इ.स. १९८७ - ) हा अफगाणिस्तानचा क्रिकेट खेळाडू आहे. १९ एप्रिल २००९ रोजी स्कॉटलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा स्तानिकझाई सध्या अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. स्तानिकझाई हा उजव्या हाताने फलंदाजी करतो तसेच तो एक मध्यम-जलदगती गोलंदाज सुद्धा आहे.