अश्विनी काळसेकर
अश्विनी काळसेकर ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे जिने मुख्यतः मराठी दूरचित्रवाणी, मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच हिंदी कौटुंबिक मालिकांमध्ये काम केले. प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीराम राघवन, रोहित शेट्टी आणि राम गोपाल वर्मा यांच्या सोबत काम करण्यात ती प्रसिद्ध आहे.[१] हिंदी मालिका सीआयडी मध्ये तिने पोलीस इन्स्पेक्टर आशा म्हणून काही काळ भूमिका निभावली होती.[२]
प्रारंभिक जीवन
[संपादन]अश्विनी काळसेकर यांचा जन्म २२ जानेवारी १९७० रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे एका मराठी कुटुंबात झाला.[१] तिचे वडील अनिल काळसेकर बँकेत कर्मचारी होते. अश्विनीने मुंबईतून बी.ए.चे शिक्षण घेतले आणि १९९१ मध्ये पदवी प्राप्त केली. तिने शिक्षणानंतर १९९१ ते १९९४ या काळात थिएटरचे शिक्षण घेतले. १९९२ ते १९९३ पर्यंत ती अभिनेत्री होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याकडे शिकत होती. १९९२ ते १९९५ या कालावधीत थिएटर अभिनय प्रशिक्षक असलेल्या मुझम्मील वकील यांच्याकडेही तिने प्रशिक्षण घेतले आहे. अश्विनी एक प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना देखील आहे.[३]
वैयक्तिक जीवन
[संपादन]अश्विनीने १९९८ मध्ये नितेश पांडेशी लग्न केले. २००२ मध्ये अज्ञात कारणांमुळे त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने २००९ मध्ये चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता मुरली शर्माशी लग्न केले.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "अश्विनी कालसेकर: एक एयरलाइन में काम करने वाली लड़की कैसे मशहूर विलेन बन गई?". thelallantop.com. 2021-01-22 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २३ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ a b ""I would love to work with Aamir Khan": Ashwini Kalsekar". 9 July 2012. 9 July 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "On a role". expressindia.com. १० ऑक्टोबर २०१२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील अश्विनी कळसेकर चे पान (इंग्लिश मजकूर)