अश्वपती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीअरविंद लिखित सावित्री : एक आख्यायिका आणि एक प्रतीक या महाकाव्यातील राजा अश्वपती ही एक मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे. महाभारतातील सावित्री आख्यान-कथेचा संदर्भ यास आहे.

अश्वपती हा मद्र देशाचा राजा असतो. तो कठोर तप करतो. तेव्हा सावित्री देवीच्या कृपाप्रसादाने त्याला कन्यारत्नाची प्राप्ती होते. तो तिचे नाव सावित्री असे ठेवतो.

श्रीअरविंद यांनी त्याला रूपकात्मक प्रतीक बनविले. राजा अश्वपती हा सावित्री महाकाव्यात मानवी जीवनाचा अधिपती म्हणून गणला गेला आहे.

[१]

  1. ^ संक्षिप्त सावित्री - ले.माधव पंडित