अविनाश साबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

अविनाश साबळे (जन्म: १३ सप्टेंबर, १९९४) हे ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारातील भारतीय खेळाडू आहेत.[ संदर्भ हवा ]

आगामी काही वर्षात देशाला ज्या खेळाडूंकडून पदकाची आशा आहे. त्यापैकी एक खेळाडू म्हणजे बीडचा अविनाश साबळे (avinash sable) होय. सध्या पटियाळा येथे फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत बुधवारी महाराष्ट्राच्या अविनाश साबळे यांनी सुवर्णपदकाची कमाई केली.

अविनाशने ३ हजार मीटर स्टीपलचेस ( steeplechase )मध्ये राष्ट्रीय विक्रमासह पदक मिळवले. त्याने ७ मिनिटे २०.२० सेकंदात नवा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे याआधीचा विक्रम २०१९ साली अविनाशच्या नावावर होता. तेव्हा त्याने २१.३७ सेकंदात हे अंतर पार केले होते.

याआधी जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अविनाशने ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्याने ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात राष्ट्रीय विक्रम मोडला होता आणि जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. इतकच नव्हे तर जागतिक स्पर्धेच्या स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश करणारा तो पहिला भारतीय पुरुष ठरला होता.

वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश धावण्याचा सराव करतोय. १२चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो भारतीय लष्कराच्या ५ महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला. अविनाशच्या या यशाबद्दल राज्याचे सामाजिक आणि न्यायमंत्री तसेच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले आहे. मुंडे यांनी हा मुलगा ऑलिंपिकमध्ये नाव काढणार हे नक्की अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळे याने रविवारी दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवला. त्याने ही शर्यत 1.00.30 सेपंद अशी पूर्ण करीत हिंदुस्थानसाठी नव्या राष्ट्रीय विक्रमावर मोहोर उमटवली. टोकियो ऑलिम्पिकसाठी 3 हजार मीटर अडथळा शर्यतीचे तिकीट बुक करणारा अविनाश साबळे 61 मिनिटांच्या आतमध्ये हाफ मॅरेथॉन पूर्ण करणारा हिंदुस्थानचा पहिलाच धावपटू ठरलाय हे विशेष.

महाराष्ट्राच्या कालिदास हिरवे याने याआधी 1.03.46 सेपंद अशा वेळेसह हाफ मॅरेथॉन पूर्ण करीत हिंदुस्थानसाठी विक्रम नोंदवला होता, पण अविनाश साबळे याने या शर्यतीत हा विक्रम मागे टाकला. याप्रसंगी केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी अविनाश साबळे याच्या कामगिरीचे काwतुक केले. दरम्यान, श्रीनु बुगाथाने 1.04.16 सेपंद अशा वेळेसह दुसरा आणि दुर्गा बहादूर बुद्ध याने 1.04.19 सेंकद अशा वेळेसह तिसरा क्रमांक पटकावला.