Jump to content

अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता विकृती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता विकृती
अपंगत्व, type of disease, neurodiversity, neurodevelopmental disorder
उपवर्गspecific developmental disorder, hyperkinetic disorder, neurodevelopmental disorder, behavioral disorder, neurodevelopmental disorder संपादन
लघुनामADHD, СДВГ, PHDA, TDAH संपादन
Studied bypsychiatry, neuropsychology संपादन
Health specialtypsychiatry, child and adolescent psychiatry संपादन
Hashtagadhd संपादन
Comorbiditynon-verbal learning disorder, ऑटिझम, स्वमग्नता, excoriation disorder संपादन
WordLift URLhttp://data.medicalrecords.com/medicalrecords/healthwise/attention_deficit_hyperactivity_disorder_adhd संपादन
ICPC 2 IDP81 संपादन
Stack Exchange taghttps://psychology.stackexchange.com/tags/adhd संपादन

अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता विकृती (इंग्रजी:अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर) (लघुरूप:एडीएचडी) ही एक वर्तनविषयक विकृती आहे. हा एक मेंदूचा आजार असून त्यात रुग्णाचे एका विशिष्ट प्रकारे वर्तन दिसून येते. अनेकदा पालक अशा तक्रारी करतात की,'मुले अजिबात स्वस्थ बसत नाहीत, सतत गडबड करतात, अभ्यासात लक्ष केंद्रित करत नाहीत' वगैरे. या तक्रारी जर तीव्र स्वरूपाच्या असतील, तर अशी मुले मस्तीखोर अथवा हूड असण्यापेक्षा या विकृतीने त्रस्त असण्याचा संभव असतो. पण एखादे मूल खूप मस्ती करत असेल, तर त्याला ही विकृती आहे किंवा तो भारी बंडखोर आहे असे ठरविण्यापेक्षा त्याचे निदान मानसोपचार तज्ञांकडून करून घेणे योग्य होय.

कारणे : अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता ही विकृती होण्यामागे आनुवंशिकता, मेंदूच्या संरचनेमध्ये बिघाड, अकाली प्रसवामुळे झालेला बालकाचा जन्म, मातेने गर्भावस्थेत केलेली व्यसने इत्यादींपैकी एक किंवा अनेक कारणे असू शकतात; पण याबाबतचे खात्रीशीर कारण अद्याप अज्ञात आहे.

लक्षणे : अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता ह्या विकृतीची लक्षणे साधारणत: मुलांच्या ३ – ६ या वयोगटात प्रामुख्याने आढळतात. लहान मुलांमध्ये ही विकृती जास्त दिसून येत असली, तरी प्रौढांमध्येही तिचा त्रास असू शकतो. मुलींपेक्षा मुलांमध्ये ही विकृती जास्त प्रमाणात आढळते. वयपरत्वे या विकृतीची लक्षणे बदलत जातात .

ही विकृती जीवघेणी अथवा भयंकर नसली तरीही तिच्यामुळे मुलांच्या शालेय जीवनावर तसेच व्यक्तीच्या कामाच्या ठिकाणी त्याच्या कामावर परिणाम होतो.

अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता ह्या विकृतीत दिसणारी लक्षणे प्रामुख्याने तीन प्रकारांत मोडतात.

  1. अवधान अस्थिरता
  2. अतिक्रियाशीलता
  3. आवेगशीलता
  • अवधान अस्थिरता : यामध्ये एकाग्रतेचा अभाव असणे, क्षणोक्षणी नवीन ठिकाणी लक्ष जाणे, एका ठिकाणी लक्ष नसल्याने छोट्या छोट्या चुका करणे, मोठ्या सूचनांकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांच्यावर सोपवलेली कामे न जमणे, तंद्री लागणे इत्यादी वर्तनबदल दिसतात.
  • अतिक्रियाशीलता : यात एका जागी स्वस्थ न बसणे, सतत चुळबूळ करत राहणे, बसल्याजागी उड्या मारत राहणे, बैठे खेळ खेळण्याचा कंटाळा येणे, सतत बडबड करणे (वाचाळता) इत्यादी लक्षणे दिसतात.
  • आवेगशीलता : यात हे लोक संभाषणात इतरांचे वाक्य पूर्ण होण्याची वाट पाहत नाहीत. खेळताना, रांगेत किंवा बोलतांना आपली पाळी येण्याची वाट बघणे यांना अवघड जाते. इतरांचे बोलणे मध्येच तोडून ही मंडळी बोलायला लागतात. प्रश्न पूर्ण होण्याआधी उत्तर देणे, पुढचा फारसा विचार न करता निर्णय घेणे अशी लक्षणेही आवेगशीलतेमुळे अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता या विकृतीत आढळतात. भावनावेग आवरणेसुद्धा यांना कठीण जाते.

उपाययोजना

[संपादन]

औषधोपचार आणि मानसोपचार यांच्या मदतीने या विकृतीवर मात करता येते. औषधोपचाराच्या मदतीने लक्ष केंद्रित होणे, चुळबुळेपणा कमी होणे, कामामध्ये सुसूत्रता येणे इत्यादी बदल दिसू शकतात. त्याचबरोबर मानसोपचारही आवश्यक असतात. रुग्णांसोबतच कुटुंबियांचेही समुपदेशन महत्त्वाचे असते. घरातील सदस्य, शिक्षक, मित्र यांच्यासोबत समुपदेशनाचे सत्र आखता येते.

प्रतिबंधात्मक उपाय

[संपादन]

आपल्या बालकाला ही विकृती होऊ नये म्हणून काळजी घेणे जास्त श्रेयस्कर आहे. मूल जन्माला येण्याआधीपासून काळजी घ्यावी. गर्भावस्थेत मातेने व्यसनापासून दूर राहणे, रासायनिक गोष्टींशी संपर्क टाळणे, पौष्टिक अन्न घेणे, मातेने अपघातापासून स्वतःला आणि नवजात बालकाला वाचवणे असे उपाय अंमलात आणावेत. औषधोपचार, रुग्णाचे स्वतःचे प्रयत्न आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या जवळच्या व्यक्तींचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे हे रुग्ण सर्वसामान्य, आनंदी व सुकर जीवन जगू शकतील.

संदर्भ

[संपादन]
  1. अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता विकृती[permanent dead link]