अल्ता कॅलिफोर्निया प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अल्ता कॅलिफोर्निया प्रदेश (स्पॅनिश:वरचे कॅलिफोर्निया) मेक्सिकोचा एक प्रांत होता. १८२४ च्या घटनेनुसार प्रत्यक्षात आलेला हा प्रांत सध्याच्या अमेरिका देशात होता. याआधी हा प्रदेश मेक्सिकोचा अल्ता कॅलिफोर्निया प्रांत नावाने ओळखला जायचा. १८२३मध्ये मेक्सिकोमध्ये लोकशाही सरकार स्थापन झाल्यावर अल्ता कॅलिफोर्निया प्रांतामध्ये असलेली छोटी वस्ती पाहून त्याला असलेला मेक्सिकोचे राज्य असा दर्जा काढून घेतली. १८३३ साली मॉंटेरेला या प्रदेशाची राजधानी केले गेले. १८३६ साली हुआन बॉतिस्ता अल्वारादोच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या उठावानंतर याला डिपार्टमेंटचा दर्जा दिला गेला व अधिक स्वायत्तताही दिली गेली. १८४८ च्या मेक्सिकन-अमेरिकन युद्धांती झालेल्या ग्वादालुपे हिदाल्गोच्या तहात हा प्रदेश मेक्सिकोकडून अमेरिकेला देणे भाग पडले. सध्या हा भाग अमेरिकेच्या कॅलिफोर्निया, नेव्हाडा, युटा तसेच ॲरिझोना, न्यू मेक्सिको, कॉलोराडो आणि वायोमिंग राज्यांमध्ये मोडतो.