अलेक्झांड्रा डडॅरिओ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अ‍ॅलेक्झांड्रा डडॅरिओ
Alexandra Daddario
जन्म अ‍ॅलेक्झांड्रा डडॅरिओ
१६ मार्च, १९८६ (1986-03-16) (वय: ३८)
न्यू यॉर्क शहर, Flag of the United States अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९९८ - चालू
प्रमुख चित्रपट टेक्सास चेनसॉ थ्रीडी, सॅन ॲंड्रेअस, बेवॉच
प्रमुख टीव्ही कार्यक्रम ऑल माय चिल्ड्रन
वडील रिचर्ड डडॅरिओ
आई क्रिस्टिना

अ‍ॅलेक्झांड्रा अ‍ॅना डडॅरिओ (इंग्लिश: Alexandra Anna Daddario) ही अमेरिकन अभिनेत्री आहे. ही पर्सी जॅक्सन फिल्म सिरीज मधील अ‍ॅनाबेथ चेस, सॅन अँड्रेअस मधील ब्लेक गेन्ज आणि बेवॉच मधील समर क्वीन या भुमिकेंसाठी ओळखली जाते.

डडॅरिओ हिने टेक्सास चेनसॉ थ्रीडी व हॉल पास या चित्रपटांत भुमिका केलीली आहे. व्हाईट कॉलर, इट्स ऑलवेज सनी इन फिलाडेल्फीया, ट्रू डिटेक्टिव्ह, न्यू गर्ल आणि अमेरिकन हॉरर स्टोरी यांसारख्या मालिकांत अतिथी भुमिका केली आहे.

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण[संपादन]

डडॅरिओ चा जन्म न्युयॉर्क शहरात झाला. ती वकील असलेल्या क्रिस्टिना आणि न्यू यॉर्क शहर पोलीस दहशदवादी विरोधी पथकाचे माजी प्रमुख रिचर्ड डडॅरिओ यांची मोठी मुलगी आहे. तिला एक भाऊ मॅथ्यु आणि कॅथरीन नावाची बहीण आहे.

कारकीर्द[संपादन]

ऑस्टिन फिल्म फेस्टिवल - ऑक्टोबर २०१६ मध्ये डडॅरिओ
वंडरकॉन - एप्रिल २०१५ मध्ये डडॅरिओ

वयाच्या १६ व्या वर्षी डडॅरिओने मालिकांत काम करण्यास सुरुवात केली. ऑल माय चिल्ड्रन मालिकेत तिने लॉरी लुईस या पीडित किशोरीची भूमिका केली.पर्सी जॅक्सन अँड दि ऑलिंपीयन: दि लाईटनिंग थिफ या चित्रपटात अ‍ॅनाबेथ चेस ही प्रमुख भूमिका केली तसेच व्हाईट कॉलर मालिकेत केट मोरो, पॅरेण्टहूड मध्ये रॅशेल या भूमिका केल्या आहेत. ती २०१२ मध्ये इमॅजिन ड्रॅगन च्या रेडिओअ‍ॅक्टिव्ह व्हिडिओत झळकली आहे. तिने टेक्सास चेनसॉत हीथर मिलर, पर्सी जॅकसनच्या व्दितीय भागात आणि बरिइंग दि एक्स या चित्रपटांत काम केले आहे. २०१४ मध्ये डडॅरिओने ट्रू डिटेक्टिव्ह मध्ये छोटी भूमिका केली. नंतर सॅन अँड्रेअस मध्ये ब्लेक गेन्ज ची भूमिका केली. त्यानंतर इतर मालिकांत विविध भूमिका केल्यात. २०१७ मध्ये डडॅरिओने बेवॉच , दि लेओव्हर आणि २०१८ मध्ये वेट या संगीत व्हिडिओत काम केलेले आहे.

फिल्मोग्राफी[संपादन]

चित्रपट[संपादन]

साल नाव भूमिका नोंदी
२००५ दि स्क्विड अँड दि व्हेल प्रीटी गर्ल
२००६ पिच ॲलेक्स लघुपट
२००६ दि हॉटेस्ट स्टेट किम
२००७ दि बेबीसिटर्स बार्बरा येट्स
२००७ दि ॲटिक अ‍ॅवा स्ट्रॉस
२०१० पर्सी जॅक्सन अँड दि ऑलिंपीयन: दि लाईटनिंग थिफ अ‍ॅनाबेथ चेस
२०१० बिरीवमेंट अ‍ॅलिसन मिलर
२०११ हॉल पास पेज
२०१३ टेक्सास चेनसॉ थ्रीडी हिथर मिलर
२०१३ पर्सी जॅक्सन: सी ऑफ मॉन्स्टर्स अ‍ॅनाबेथ चेस
२०१३ लाईफ इन टेक्स्ट हॅली ग्रीन लघुपट
२०१४ बरिइंग दि एक्स ऑलिव्हिया
२०१५ सॅन अँड्रेअस ब्लेक गेन्ज
२०१६ दि चॉईस मोनिका
२०१६ बेक्ड इन ब्रुकलिन केट विन्स्टन
२०१७ बेवॉच समर क्वीन
२०१७ दि हाऊस कॉरसिका
२०१७ दि लेओव्हर केट जेफ्रीज
२०१८ व्हेन वी फर्स्ट मेट अ‍ॅव्हरी मार्टिन नेटफ्लिक्सपट
२०१८ वी हॅव ऑलवेज लिव्ड इन दि कॅसल कॉन्स्टन्स ब्लॅकवूड निर्माणाधीन
२०१८ नॉमिस रॅशेल निर्माणाधीन
२०१८ आय अ‍ॅम नॉट अ बर्ड मार्गारेट निर्माणाधीन

दूरचित्रवाणी[संपादन]

साल नाव भुमिका नोंदी
२००२-२००३ ऑल माय चिल्ड्रन लॉरी लुईस ४३ एपिसोड
२००४ लॉ अँड ऑर्डर फेलिसिया एपिसोड: "एनिमी"
२००५ लॉ अँड ऑर्डर: क्रिमिनल इन्टेन्ट सुझी आर्मस्ट्रॉंग एपिसोड: "इन दि वी स्मॉल अवर्स (पार्ट १)"
२००६ कन्व्हिक्शन व्हॅनेसा एपिसोड: "पायलट"
२००६ दि सोप्रॅनॉस अनादर वीमन एपिसोड: "जॉनी केक्स"
२००६ लॉ अँड ऑर्डर समॅंथा बेर्सफोर्ड एपिसोड: "रिलीज"
२००९ डॅमेजेस लिली आर्सेनॉल्ट एपिसोड: "आय लाइड, टु"
२००९ लाईफ ऑन मार्स एमिली "रॉकेट गर्ल" वाएट एपिसोड: "लेट ऑल दि चिल्ड्रन बुगी"
२००९ नर्स जॅकी यंग वीमन एपिसोड: "पायलट"
२००९ लॉ अँड ऑर्डर: क्रिमिनल इन्टेन्ट लिजा वेलेस्ली एपिसोड: "सॅलोमी इन मॅनहॅटन"
२००९-२०११ व्हाईट कॉलर केट मोरो ७ एपिसोड
२०११-२०१२ पॅरंटहूड रॅशेल ५ एपिसोड
२०१२ इट्स ऑलवेज सनी इन फिलाडेल्फीया रुबी टॅफ्ट एपिसोड: "चार्ली अँड डी फाईंड लव्ह"
२०१४ ट्रू डिटेक्टिव्ह लिजा ट्रग्नेटी ४ एपिसोड
२०१४ न्यू गर्ल मिशेल २ एपिसोड
२०१४ मॅरीड एला दि वेट्रेस एपिसोड: "पायलट"
२०१५ दि लास्ट मॅन ऑन अर्थ व्हिक्टोरिया एपिसोड: "अलाईव्ह इन टकसन"
२०१५ अमेरिकन हॉरर स्टोरी नताशा रॅमबोवा ३ एपिसोड(हॉटेल)
२०१६ वर्काहॉलिक्स डोना एपिसोड: "सेव्ह दि कॅट"
२०१६ रोबोट चिकन थेरेसा जॉन्सन / लीना एपिसोड: "जोएल हरवित्झ रिटर्न्स"
२०१७ डु यु वॉन्ट टु सी अ डेड बॉडी ? स्वतः एपिसोड: "ए बॉडी अँड अ प्लेन"

वेब[संपादन]

साल नाव भुमिका नोंदी
२००९-२०१० ऑड जॉब्ज कॅसी स्टेटनर ३ एपिसोड

संगीत चलचित्र[संपादन]

साल नाव आर्टिस्ट
२०१२ "रेडिओअ‍ॅक्टिव्ह" इमॅजिन ड्रॅगन्ज
२०१७ "जुडी फ्रेंच" व्हाईट रिपर
२०१८ "वेट" मरून फाईव्ह

व्हिडिओ गेम[संपादन]

साल नाव भुमिका
२०१५ बॅटलफिल्ड हार्डलाईन ड्युन अल्पर्ट आवाज आणि गती चित्रांकन
२०१६ मार्वल अव्हेंजर्स अकॅडमी यानेट वॅन डाइन / दि वास्प आवाज

पुरस्कार आणि नामांकने[संपादन]

साल पुरस्कार कॅटेगरी नामांकित चित्रपट परिणाम
२०१० २०१० टीन चॉईस अवार्ड चॉईस ब्रेकआऊट फिमेल
पर्सी जॅक्सन अँड दि ऑलिंपीयन: दि लाईटनिंग थिफ
नामांकन
२०१३ २०१३ एम टीव्ही मुवी अवार्ड्स एम टीव्ही मुवी अवार्ड फॉर बेस्ट स्केअर्ड-ॲज-शीट परफॉर्मन्स टेक्सास चेनसॉ थ्रीडी
नामांकन
२०१५ २०१५ टीन चॉईस अवार्ड्स चॉईस मुवी ॲट्रेस: ॲक्शन ॲडवेंचर
सॅन अँड्रेअस
नामांकन
२०१७ २०१७ टीन चॉईस अवार्ड्स चॉईस मुवी ॲट्रेस: कॉमेडी
बेवॉच
नामांकन