अरुणा भट
Appearance
अरुणा भट (२६ जून, इ.स. १९५२ - २७ जानेवारी, इ.स. २०१६: पुणे, महाराष्ट्र) या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री होत्या. त्या २०११ ते २०१६ दरम्यान नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या कार्यकारिणी सदस्या होत्या.
त्यांनी डार्लिंग डार्लिंग, घरोघरी हीच बोंब, नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल, बायको नसावी शहाणी या नाटकांत अभिनय केला. अशा अनेक नाटकांसह त्यांनी चित्रपटांत देखील विविध भूमिका साकारल्या आहेत.
नाटके आणि भूमिका
[संपादन]- अपराध मीच केला
- अश्रूंची झाली फुलं
- आता असो द्यावी दया (विमल)
- आंधळी कोशिंबीर (आई)
- एक मम्मी दोन पप्पा (माधवी)
- एर होस्टेस
- एखाद्याचं नशीब (वहिनी)
- कथा कुणाची व्यथा कुणा (रत्ना)
- करायला गेलो एक (झेलम, नूतन)
- कोपता वास्तुदेवता (मोठी जाऊ)
- कोलंबस वाट चुकला
- गारंबीचा बापू
- घरोघरी हीच बोंब (राधाकाकू)
- चला आळंदीला चंद्रावळ)
- डार्लिंग डार्लिंग (मोना)
- तुझे आहे तुजपाशी (उषा, गीता)
- ते तसे तर मी अशी (जेनी)
- तुळस तुझा अंगणी (सुलभा)
- थांबा थांबा अघोळ आहे
- दिया तले अंधार
- दिल्या घरी तू सुखी रहा (अलका)
- दिवाजळू दे सारी रात (ताई)
- दैवे लाभला चिंतामणी
- नवरा माझ्या मुठीत गं (संध्या)
- नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल (सुनीता)
- नाथ हा माझा (मनीषा)
- पतंगापरी जीवन माझे (शब्बो)
- पुरुषांना आवडतात बायका (कामिनी)
- बबन प्रभू (आई)
- बायको नसावी शहाणी (ताराराणी)
- बेबंदशाही (ताराऊ, तुळसा)
- राजकारण गेलं चुलीत (सेक्रेटरी)
- लग्नाची बेडी (रश्मी)
- लफडासदन (बाईसाहेब)
- वय वेडं असतं
- वरचा मजला रिकामा (मंजू)
- वेगळं व्हायचंय मला (मंदा, वहिनी)
- वेड लागले राधेला
- शॉर्टकट
- संभूसांच्या चाळीत
- साष्टांग नमस्कार (त्रिपुरी)
- सुनबाई घर तुझं आहे
- स्वयंसिद्धा (चंडी, मिनी)
दूरचित्रवाणी मालिका
[संपादन]- अकलेचे तारे
- अवंतिका
- तुझेनी माझे जमेना