अमिश त्रिपाठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अमिश त्रिपाठी (जन्म : १८ ऑक्टोबर, १९७४) हे एक इंग्लिश भाषेत लिहिणारे भारतीय लेखक आहेत. शिवाच्या जीवनावर आधारित तीन इंग्रजी पुस्तकांच्या मालिकेचे त्यांनी लेखन केले आहे. ‘दि इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा’, ‘दि सीक्रेट्स ऑफ दि नागा’ आणि ‘दि ओथ ऑफ दि वायुपुत्राज’ ही ती तीन पुस्तके आहेत.

’साइअन (Scion) ऑफ इक्ष्वाकु’, ‘दि महाभारता सीक्रेट’ हीही त्यांची पुस्तके असून ‘सीता वॉरियर ऑफ मिथिला’ हे त्यांचे आगामी पुस्तक आहे. हे रामचंद्र मालिकेतले दुसरे पुस्तक असेल. अमिश त्रिपाठी यांची 21 जून 2019 रोजी लंडन येथील नेहरू केंद्राचे संचालक म्हणून निवड करण्यात आली.