अब्दुल अहद ’साज’

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अब्दुल अहद ‘साज’ (जन्म : मुंबई, १६ ऑक्टोबर १९५०) हे मुंबईत राहणारे एक उर्दू शायर आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव अब्दुल रज्जाक सय्यद, तर पत्‍नीचे फरीद.

मुंबईच्याच नव्हे तर भारतील उर्दू साहित्य वर्तुळात एक सुसंस्कृत शायर म्हणून त्यांची ओळख आहे. अत्यंत शांत, धीम्या स्वरात ते ग़ज़ल, नज्म, गीत, दोहे, रुबाइया, माहिये प्रभावीपणे पेश करतात. त्यांची शायरी पारंपरिक शायरीचे आधुनिक पण ‘लाऊड’ न होणारी शायरी आहे.

मुंबईचा अब्दुल अहद ‘साज’ हे १९७० नंतर उर्दू शायरांची जी नवी पिढी काव्य करू लागली झाली तिच्यातले एक महत्त्वपूर्ण शायर मानले जातात.

‘साज’ हे फार संवेदनशील आहेत. मित्र मंडळ, ज्येष्ठ परिचित-अपरिचित कवी, कलाकार यांच्या मरणाने ते व्यथित होतात. आत्या, बहीण, आजी, वडील यांच्या मरणावर त्याने शोक-काव्ये लिहिलीच, पण त्याशिवाय कवी फैज, गालिब, मजरूह सिकंदर अली वज्द, कालिदास गुप्ता इत्यादींच्या तसेच नौशाद, मोहम्मद रफींच्या मरणावरील त्यांच्या कविता उदास करणार्‍या आहेत.

अब्दुल अहद यांचे प्रकाशित उर्दू काव्यसंग्रह[संपादन]

  • अजंठा, एलोरा (दीर्घ काव्य)
  • खा़मोशी बोल उठी है (डिसेंबर १९९०)
  • सरगोशियॉं ज़माने की (ऑक्टोबर २००३)

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • जेमिनी अकादमी हरियाणा ॲवार्ड (१९९७)
  • पश्चिम बंगाल उर्दू अकादमी ॲवार्ड (२००३)
  • बिहार उर्दू अकादमी ॲवार्ड (२००३)
  • महाराष्ट्र उर्दू साहित्य अकादमी ॲवार्ड (१९९१)
  • महाराष्ट्रातील युवा भारती या बारावीच्या क्रमिक पुस्तकात आणि ५वी, ६वी, ९वीच्या बालभारती या पाठ्यपुस्तकांत कवितांचा समावेश