अनू आगा
Appearance

अर्नवाझ अनू आगा (जन्म : मुंबई, इ.स. १९४२) या भारतीय उद्योगपती आणि समाजसेविका आहेत. या थरमॅक्स लिमिटेड कंपनीच्या चेरमन होत्या.[१][२] २००७मध्ये या भारतातील सर्वात धनाढ्य आठ महिलांपैकी एक आणि ४० धनाढ्य भारतीयांपैकी एक होत्या.
कारकीर्द
[संपादन]आगा या सन १९८५मध्ये थरमॅक्स कंपनीत दाखल झाल्या. १९९१-९६ दरम्यान त्या तेथील मनुष्यबळ विभागाच्या मुख्याधिकारी होत्या. त्यांचे पती रोहिंटन आगा यांच्या १९९६ मधील मृत्यूनंतर अनू आगा यांनी थरमॅक्सचे चेरमनपद घेतले. अनू आगा यांच्या निवृतीनंतर त्यांची मुलगी मेहेर पदमजी या चेरमन झाल्या.
निवृत्तीनंतर अनू आगा यांनी सामाजिक कार्यात रस घेण्यास सुरुवात केली. त्या टीच फॉर इंडिया या संस्थेच्या चेरमन आहेत. त्या भारतीय राज्यसभेच्या नियुक्त सभासद असून समाजसेवेशी निगडित अश्या राज्यसभेतील अनेक समित्यांवर त्या काम करतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Anu Aga". Forbes (इंग्रजी भाषेत). March 6, 2018. 2018-08-22 रोजी पाहिले.
- ^ "Anu Aga passes Thermax baton to new chairperson". इंडियन एक्सप्रेस. 5 October 2004.