अनुनाकी
Appearance
अनुनाकी ( सुमेरियन : 𒀭𒀀𒉣𒈾यांचा उल्लेख अन्नुंनाकी, अनुंना, अननाकी असाही केला जातो) हा एक देवतांचा समूह आहे, ज्यांचे सुमेरियन, अक्किडियन, असिरियन व बाबिलोनियन काळात पूजन होत असे. सर्वात जुन्या सुमेरियन काळातील म्हणजेच अक्किडियन उत्तर काळातील लिखाण व शिलालेखांनुसार या पॅंथियन देवता आहेत, ज्या अन् आणि की यांचे वंशज असल्याचे मानले जाते, अन् म्हणजेच स्वर्गाची देवता आणि की म्हणजे पृथ्वीची देवता आहे. अनुनाकी देवतांचे मुख्य कार्य होते मानवतेचे भाग्य . यांच्यात अपकल्लूमध्ये गफलत करू नये.