अनुकृतीचा सिद्धांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अनुकृतीचा सिद्धांत हा सॉक्रेटीसचा शिष्य आणि ॲरिस्टॉटलचा गुरु प्लेटो याने सुमारे इ. स. पूर्व २०० वर्षापूर्वी मांडलेला साहित्यसिद्धांत आहे. हा सिद्धांत त्याने त्याच्या 'पोएटिक्स' या ग्रंथात मांडला आहे. तो त्याचा गुरु प्लेटो याने ललित कलेवर घेतलेल्या आक्षेपाचे उत्तर देण्यासाठी मांडला आहे. प्लेटोने त्याच्या 'रिपब्लिक' या ग्रंथात ललितकृतीवर गंभीर आक्षेप घेतला होता. त्याचे उत्तर देण्यासाठी ॲरिस्टॉटलने हा सिद्धांत सांगितला आहे.

सिद्धांताची पार्श्वभूमी [संपादन]

‘अनुकृतीच्या सिद्धांता’ला ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोची पार्श्वभूमी आहे. त्याने त्याच्या ‘रिपब्लिक’ या राज्यशास्त्र विषयवरील ग्रंथात ‘आदर्श राज्याची कल्पना’ मांडली. तिच्यात, ‘कलावंत सत्य रेखाटत नाहीत तर सत्याबद्दलचे भास रेखाटतात’ असा  कवी-कलावंत यांच्याबाबत नैतिक आक्षेप नोंदवत त्यांना आपल्या आदर्श राज्यातून हद्दपार करतो.  

प्लेटोचे ललित कलाकृतीवर आक्षेप[संपादन]

  1. 'कलावंत ललित कृतीत सत्य सांगत नाही, सत्याचे भास रेखाटतात.'

'ललितकृती ही सत्यापासून दोनदा ढळते.' कारण जीवनाची अनुकृती (IMITATION- अनुकरण) असते. आणि जीवन हे चिद्रुपाची अनुकृती (IMITATION-अनुकरण) असते.[१] असे आक्षेप प्लेटोने घेतले होते. त्याच्या मते, जीवन हेच मुळात सत्य नाही. सत्य जीवनाची कल्पना म्हणजे चिद्रूप सत्य आहे.


संदर्भ[संपादन]

  1. ^ ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र, गो. वि. करंदीकर, मौज प्रकाशन, मुंबई