अनिर्बन लाहिरी
Appearance
अनिर्बन लाहिरी (२९ जून, १९८७:पुणे, महाराष्ट्र, भारत - ) हा एक भारतीय व्यावसायिक गोल्फ खेळाडू आहे. तो एशियन टूर, युरोपियन टूर, पीजीए टूर आणि एलआयव्ही गोल्फ स्पर्धांमध्ये खेळतो. याला २०१४ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. [१] [२] लाहिरीला आनंदबाजार पत्रिकाने २०१५ मध्ये "सेरा बंगाली" पुरस्कार दिला. [३]
लाहिरीने २०१६ उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये रिओ दि जनेरो आणि २०२० उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये तोक्यो येथे भारताचे प्रतिनिधित्व केले.
ऑगस्ट २०२२मध्ये लाहिरीने एलआयव्ही गोल्फ या स्पर्धासाखळीत भाग घेणे सुरू केले. [४] त्याच्या पहिल्या गोल्फ स्पर्धेत लाहिरीने LIV गोल्फ आमंत्रण बोस्टन येथे डस्टिन जॉन्सन आणि वाकिन नीमन यांच्या बरोबरीने पहिले स्थान मिळवले आणि बाद फेरी मध्ये दुसरा क्रमांक मिळवत १८,१२,५०० डॉलर कमावले.
संदर्भ
[संपादन]- ^ "LIST OF ARJUNA AWARD WINNERS - Football | Ministry of Youth Affairs and Sports". yas.nic.in. Ministry of Youth Affairs and Sports. 25 December 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 December 2007 रोजी पाहिले.
- ^ "List of Arjuna Awardees (1961–2018)" (PDF). Ministry of Youth Affairs and Sports (India). 18 July 2020 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 12 September 2020 रोजी पाहिले.
- ^ "ABP Ananda recognises Bengali achievers with Sera Bangali Awards". bestmediainfo.com. Delhi. 28 August 2015. 26 December 2022 रोजी पाहिले.
- ^ Schlabach, Mark (30 August 2022). "Open champion Cameron Smith, five others leave PGA Tour for LIV Golf". ESPN. 30 August 2022 रोजी पाहिले.