Jump to content

अनिरुद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनिरुद्ध (संस्कृत: अनिरुद्ध अर्थ:नियंत्रणरहित,गतीमान,क्रियाशील,न थांबविता येण्याजोगा) हा एक संस्कृत शब्द असून तो इतर सर्व भारतीय भाषांमध्ये नाम(नाव)म्हणून वापरण्यात येतो.हिंदू पुरुष व्यक्तीचे नाव म्हणून अनिरुद्ध हा शब्द प्रचलीत आहे.तसेच पुराणात अनिरुद्ध हा प्रद्युम्न(भगवान विष्णुंचे एक रूप ,एक नाव ) चा मुलगा होता व भगवान श्रीकृष्णाचा नातू होता असा उल्लेख आहे. तो आपल्या आजोबांप्रमाणे पुरुषोत्तम होता.तसेच तो जन अवतार होता अशी देखील पुराणात मान्यता आहे. विष्णुच्या चार प्रमुख रुपे वासुदेव,संकर्षण,प्रद्युम्न,अनिरुद्ध ह्यापैकी एक अवतार अनिरुद्धदेखील आहे. ह्या चारही रूपांना विष्णु-तत्त्व असे देखील संबोधले जाते.अनिरुद्ध म्हणजे असे तत्त्व जे प्रत्येक जीवातील आत्म्यात परमात्म्याच्या स्वरूपात विराजमान आहे.