Jump to content

अताकामा रेडिओ दुर्बीण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अताकामा लार्ज मिलिमीटर/सबमिलिमीटर ॲरे
संस्थाबहुराष्ट्रीय
स्थळयानो दे चाक्स्नांतोर वेधशाळा
अताकामा वाळवंट, चिले
निर्देशांक23°01′9.42″S 67°45′11.44″W / 23.0192833°S 67.7531778°W / -23.0192833; -67.7531778
उंची५,०५८.७ मी (१६,५९७ फूट)
दूरदर्शक श्रेणी इंटरफेरॉमीटर (ऑप्टिकल फायबरने जोडलेले ६६ ॲंटेना)
व्यास१२ मी
संकेतस्थळअधिकृत अल्मा संकेतस्थळ
अधिकृत एन्आर्‌एओ अल्मा संकेतस्थळ
अधिकृत ईएस्ओ अल्मा संकेतस्थळ
अधिकृत एन्एओजे अल्मा संकेतस्थळअताकामा लार्ज मिलिमीटर/सबमिलिमीटर ॲरे (अल्मा) हा एक रेडिओ इंटरफेरॉमीटर (रेडिओ दुर्बीण) आहे. चिले देशातील उत्तरेतील अताकामा वाळवंटात असलेल्या या प्रल्कपात १२ मीटर व्यासाच्या ६६ ॲंटेना अवकाशातून येणारे रेडिओ तरंग ग्रहण करण्यासाठी उभारण्यात आल्या आहेत. ही रेडिओ दुर्बीण ०.३ ते ९.६ मिमी तरंगलांबी वापरून अवकाशाचा शोध घेते. अल्माचा मुख्य हेतू विश्वाच्या आरंभकाळात झालेल्या ताऱ्यांच्या निर्मितीचा व सांप्रत विश्वातील ताऱ्यांचा आणि ग्रह निर्मितीचा अभ्यास करणे हा आहे.