अक्कल दाढ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अक्कल दाढ हा मानवाच्या तोंडातील सर्वात शेवटचा दात असतो.अक्कल दहाडा या मुखात सर्वात शेवटचे दात असतात. चार अक्कल दाहाडा जबड्याच्या वरच्या बाजूला दोन आणि खालच्या बाजूला दोन अश्या उगतात.

अक्कल दाढ
अक्कल दाढ़
अक्कल दहाडा
अक्कल दाढ़
Lower mandibular third molar impaction pericoronitis diagram.jpg

आकृतित- A ,D ह्या अक्कलदाढा आहे.B ही सामान्य दहाड आहे.

ते चार असतात वर च्या बाजूने दोन आणि खालच्या बाजूने दोन. केव्हा केव्हा ते हिरडी. तून पूर्ण पणे वर येत नाहीत, तर केव्हा केव्हा दोन क्रमांकाच्या दाढे मुळे त्यांना वर यायला पुरेशी जागा नसते. त्यामुळे तेथे हिरडीत अन्न अटकते. वेदना होतात म्हनून अक्कल दाढेला शस्त्रक्रिये द्वारे काढून टाकले जाते.[१]अक्कल दहाडा या मानवाच्या तोंडातील सर्वात शेवटचा दहाडांचा संच असतो[२].

अक्कल दाढ दुखणे[संपादन]

मानवास सामान्यत्वे दोन दहाडा असतात. उजव्या बाजूस दोन, डाव्या बाजूस दोन. वरती सुध्धा उजव्या बाजूला दोन, दव्या बाजूला दोन दाहादा असतात. त्यांना पहिली मोलार (दाहाड), दुसरी मोलार म्हणतात.तिसरी दहाड उगते तीला अक्कल दहाड किंवा तिसरा मोलार (मराठी-तिसरी दहाड, इंग्रजी- Third Molar) म्हणातात. अक्कल दाढ हा मानवाच्या तोंडातील सर्वात शेवटचा दात असतो. काही लोकांना अक्कल दाढा उगतात तर काहींना सपशेल उगत नाही. अक्कल दाढा उगत असताना पुरेशी जागा नसल्यामुळे अक्कल दाढा एक आणि दोन क्रमांकाच्या दाढेला ढकलतात त्यामुळे वेदना होतात, हिराळी सुजते आणि केव्हा केव्हा डोकं सुद्धा दुखू शकते.

अक्कल दाढे मुळे या दाढेच्या पुढची दहाड तिरपी होऊ शकते व वरच्या व खालच्या अक्कल दाढान मुळे गाल आतून चावला जातो. त्यामुळे तोंडात गालाला आतून जखम होते. अश्या परिस्थितीत डॉक्टर अक्कल दहाड शस्त्रक्रियेद्वारे उपटून काढून टाकावी लागेलं असे सांगतात.
  समण्यात्वे अक्कल दाढ मुळे अन्न हिराळीत अटकते,अक्कल दहाळ जवळ असलेल्या हिरळी ला सुज येते,वेदना होतात.

अक्कल दाढ काढण्याचि शस्त्र क्रिया[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

अक्कल दाढ उपटण्याच्या प्रक्रिया ओरल सर्जन (मुख शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर) ,दातांचा डॉक्टर करतो. त्यासाठी डॉक्टर लोकल अनेस्थेसीया म्हणजेच ज्या जागेवर शास्त्र क्रिया करायची आहे तिथे बधीर करण्याचे इंजेक्शन देतो. दहाड जर हिरळी खाली अर्धवट किंवा पूर्ण असेल तर हिराळीला कट करून दहाळ ला मोकळी करतो. त्यानंतर ' साहित्या च्या साहाय्याने दाताला टूथ साॅकेट मधून वर ढकलले जाते. अक्कल दहाड उपटल्या नंतर हिरळिला‌ एक,द़ोन टाके लावले जातात.

संदर्भ[संपादन]

  1. ^ देशमुख, डॉ.अनिल (२५ जानेवारी २०१८). "अक्कल दहाड हा मानवाच्या तोंडातील सर्वात शेवटचा दात असतो.". पुढारी. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक २५ जानेवारी २०१८ रोजी मिळविली). १२ जानेवारी २०२० रोजी पाहिले. 
  2. ^ "अक्कल दाहाडा या मानवाच्या तोंडातील सर्वात शेवटचा दातांचा संच असतो.". WebMD.com. Web. १२ जानेवारी २०२० रोजी पाहिले.