अंजली भारद्वाज
अंजली भारद्वाज | |
---|---|
जन्म |
१९७३ |
अंजली भारद्वाज (जन्म १९७३) या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहेत. या पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या मुद्यांवर काम करतात. त्या नॅशनल कॅम्पेन फॉर पीपल्स राइट टू इन्फॉर्मेशन (एनसीपीआरआय)[१] संस्थेच्या सह-संयोजक आणि सतर्क नागरिक संघटनेच्या संस्थापक सदस्य आहेत.[२] माहितीचा अधिकार, लोकपाल, व्हिसल ब्लोअर संरक्षण, तक्रार निवारण आणि अन्नाचा अधिकार या विषयांवर त्या काम करतात.
प्रारंभिक जीवन
[संपादन]अंजली भारद्वाज यांनी दिल्ली विद्यापीठातील लेडी श्रीराम कॉलेजमधून बीए केले आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून एमएससी आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, दिल्ली विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.[३]
काम
[संपादन]अंजली भारद्वाज १९९९ पासून भारतातील माहिती अधिकाराच्या चळवळीत सहभागी आहेत. अंजली पारदर्शकतेचा प्रश्न अतिशय ठामपणे मांडतात.[४] त्या माहितीच्या अधिकाराची राष्ट्रीय मोहीम (एन.सी.पी.आर.आय) या संस्थेच्या एक सह-संयोजक आहेत. त्यांनी माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ साठी महत्वपूर्ण काम केले होते. तसेच व्हिसल ब्लोअर्स संरक्षण कायदा, २०११ साठीही त्यांनी काम केले आहे.[५] इतर कामांमध्ये लोकपाल आणि लोकायुक्त कायदा, २०१३,[६] आणि तक्रार निवारण विधेयक समाविष्ट आहेत.[७]
अंजली सतर्क नागरिक संघटनेच्या (एस.एन.एस.) संस्थापक सदस्या आहेत.[८] ही स.न.अ. २००३ मध्ये स्थापित आहे. सतर्क नागरिक संघटना भारत सरकारची जबाबदारी सुधारण्यात मदत करते आणि यासाठी माहिती अधिकार कायद्याचा वापर करते.[९] एसएनएसने आमदारांच्या कामगिरीवर विकसित केलेले रिपोर्ट कार्ड माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केले जातात.
पुरस्कार आणि सन्मान
[संपादन]अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने अंजलीला "इंटरनॅशनल अँटी करप्शन चॅम्पियन्स अवॉर्ड" देऊन सन्मानित केले आहे, त्यासाठी त्या १२ जागतिक अँटी करप्शन चॅम्पियन्समध्ये एक होती.[१०] निवडलेल्या प्रतिनिधींच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा वापर केल्याबद्दल अंजली यांना सामाजिक उद्योजकांसाठी २००९ मध्ये अशोक फेलोशिप हा पुरस्कार देण्यात आला.[११] प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी २०११ मध्ये तिला लेडी श्री राम कॉलेजचा ऑनर रोल सादर करण्यात आला.[१२]
लेख
[संपादन]त्यांनी माध्यमांमधील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या मुद्द्यांवर विस्तृत लिहिलेले आहे:
- भारतातील आरटीआय पद्धतीचे पीपल्स मॉनिटरिंग २०१२ - २०१३ [१३]
- लोकपाल सुधारणांवरील लेख - इंडियन एक्सप्रेस [१४]
- व्हिसल ब्लोअर्स प्रोटेक्शन ॲक्टवरील लेख - इंडियन एक्सप्रेस [१५]
- भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यावरील लेख - हिंदू [१६]
- लोकपाल कायद्यावरील लेख - ई.पी.डब्ल्यु [१७]
- लोकपाल विधेयकावरील लेख - इकॉनॉमिक टाइम्स [१८]
- माहिती अधिकार कायद्यातील प्रस्तावित सुधारणांवरील लेख - आउटलुक मासिक [१९]
- माहिती आयोगांच्या कामगिरीवरील लेख - द डेक्कन हेराल्ड [२०]
- माहिती अधिकार कायद्यावरील लेख - आउटलुक मॅगझिन [२१]
संदर्भ
[संपादन]- ^ "NCPRI » Structure". righttoinformation.info. 12 October 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-11 रोजी पाहिले.
- ^ Anuja (2013-11-01). "Satark Nagrik Sangathan | Know whom you are voting for". Livemint. 2016-10-11 रोजी पाहिले.
- ^ "The Telegraph — Calcutta: Jobs". www.telegraphindia.com. 2016-10-11 रोजी पाहिले.
- ^ Bhardwaj, Anjali (23 June 2020). "Transparency during a crisis" – www.thehindu.com द्वारे.
- ^ "Whistleblowers' Bill Likely to Face Rough Weather in Rajya Sabha". NDTV.com. 2016-10-11 रोजी पाहिले.
- ^ Bhatnagar, Gaurav Vivek. "Lokpal Amendment Diluting Act's Purpose, says Anjali Bhardwaj". thewire.in. 2016-10-11 रोजी पाहिले.
- ^ "Citizens Charter: She was denied pension for years". Governance Now. 2016-08-01. 2016-10-11 रोजी पाहिले.
- ^ "Satark Nagrik Sangathan". www.snsindia.org. 2016-10-11 रोजी पाहिले.
- ^ Vidani, Peter. "Case Study #11: Satark Nagrik Sangathan's Report Cards for Elected Representatives". Opening Parliament Blog. 2016-10-11 रोजी पाहिले.
- ^ "Recognizing Anticorruption Champions Around the World | US Department of State". 2021-02-25 रोजी पाहिले.
- ^ "Anjali Bharadwaj | Ashoka - India". india.ashoka.org. 2016-09-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-11 रोजी पाहिले.
- ^ "Lady Shri Ram College". lsr.edu.in. 18 May 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-11 रोजी पाहिले.
- ^ "RaaG — CES RTI study 2011 - 13". RTI Assessment and Advocacy group (इंग्रजी भाषेत). 2017-04-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-11 रोजी पाहिले.
- ^ "Betrayal In The House". The Indian Express. 2016-08-04. 2016-10-11 रोजी पाहिले.
- ^ "Whistleblowing in the time of Vyapam". The Indian Express. 2015-08-13. 2016-10-11 रोजी पाहिले.
- ^ Bhardwaj, Anjali; Johri, Amrita (2016-05-06). "How not to fight corruption". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2016-10-11 रोजी पाहिले.
- ^ "The Lokpal Act of 2014". Economic and Political Weekly. 49 (5). 2015-06-05.
- ^ "The proposed Jan Lokpal is all too powerful: Anjali Bhardwaj, A member of the working committee of the National Campaign for Peoples' Right to Information - The Economic Times". The Economic Times. 2016-10-11 रोजी पाहिले.
- ^ "Let's All Come To The Party". Outlook India. 2016-10-11 रोजी पाहिले.
- ^ "Tardy working of info panels". Deccan Herald. 2016-10-11 रोजी पाहिले.
- ^ "R Stands For..." Outlook India. 2016-10-11 रोजी पाहिले.