अंकुरकलम
Appearance
अंकुरकलम (Epicotyl grafting) साधारण 4 ते 8 दिवसाच्या आंब्याच्या कोवळ्या रोपावर हे कलम करण्यात येते. कलमफांदीच्या कोवळ्या फांद्याची पाने काढून पूर्वतयारी करण्यात येते. पाचरकलमपद्धतीने कलम खुंटावर करतात. पाचर कलमानंतर पाॅलिथीनच्या पट्टीने बांधून काढतात. अशी बांधलेली कलमे ताबडतोब मडक्यात स्थलांतरित करतात. ही कलमे पावसाळ्यात बांधतात कारण त्या काळात हवेत आर्द्रता जास्त असते. एक महीन्यानंतर कलमफांदीचे डोळे फुटतात या पद्धतीत उत्तर भारतात 33 ते 50 % यश मिळते.