Jump to content

'स्व'-रूपवर्धिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'स्व'-रूपवर्धिनी ही पुण्यात काम करणारी सामाजिक संस्था आहे.

संस्थेची स्थापना

[संपादन]

‘स्व’-रूपवर्धिनी या स्वयंसेवी संस्थेची स्थापना १३ मे १९७९ रोजी झाली. कृष्णाजी लक्ष्मण पटवर्धन (किशाभाऊ पटवर्धन) यांनी स्व'-रूपवर्धिनीची स्थापना केली. पुण्याच्या विविध भागांमध्ये एकंदर १६ ठिकाणी या संस्थेच्या शाखा आहेत.

१९७९ साली शासनसेवेतून निवृत्त झाल्यानंतर किशाभाऊंनी स्व-रूपवर्धिनी या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला, संस्थेचे काही नाव नव्हते, पण त्यांच्या सहकाऱ्यांसह चर्चांमधून आणि सहविचारातून १३ मे १९७९ रोजी स्वरूपवर्धिनी चे कार्य सुरू झाले. या संस्थेमार्फत वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हुशार मुलांना संधी व आधार देऊन त्यांचे सुप्त गुण विकसित करणे हा त्यांचा हेतू होता. संस्थेची सुरुवात पुण्यातील मंगळवार पेठेतील एका कारखान्याच्या शेडमध्ये काही विद्यार्थ्यांपासून झाली. पुढे या कार्याचा विस्तार विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांतून झाला.[]

संस्थेचे स्वरूप

[संपादन]

एक चांगला नागरिक घडावा यासाठी जी मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवली पाहिजेत अशा विषयांसाठी औपचारिक शाळेच्या वेळानंतर चालणारा उपक्रम आहे. आर्थिक दुर्बल गटातील मुलांसाठी बालवाडी वर्ग, वस्तींतील शालेय मुलांसाठी दैनंदिन शाखा, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा केंद्र, स्त्रियांसाठी बचत गट व प्रशिक्षण केंद्र असे संस्थेच्या कामाचे स्वरूप आहे.[] भारतीय नागरिकांचा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, शारीरिक आणि आर्थिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहणे हे या संस्थेचे ध्येय आहे.

संस्थापक

[संपादन]

स्वरूपवर्धिनी संस्थेचे संस्थापक दिवंगत किशाभाऊ पटवर्धन हे निवृत्त मुख्याध्यापक व समाजकार्यकर्ते होते. शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशीलता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची जिद्द यासाठी ते ओळखले जात.[] किशाभाऊ पटवर्धन यांना रामकृष्ण परमहंस यांच्या शिकवणीचा, डॉ. हेडगेवारांच्या विचारांचा तसेच दादाराव परमार्थ यांचा प्रभाव होता. त्यांच्या प्रेरणेनेच त्यांनी आयुष्यभर समाज व राष्ट्रसेवा करण्याचे ध्येय जोपासले.

संस्थेचे बोधवाक्य

[संपादन]

रुपरंग वा असो गंधही | यातील माझे काहीच नाही | श्रेयाचा मज नको लेशही | निर्माल्यात विरावे || विकसित व्हावे, अर्पित होऊन जावे || हे या संस्थेचे बोधवाक्य आहे.

संस्थेचा विकासक्रम

[संपादन]

संस्थेच्या शाखा

[संपादन]

स्व'-रूपवर्धिनी संस्थेच्या विविध शाखा पुण्यात कार्यरत आहेत. या शाखा संस्थेच्या उद्दिष्टानुसार विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवितात.

शाखा नाव स्थापना तारीख प्रभाग/ क्षेत्र
स्वामी श्रद्धानंद शाखा ०९ ऑगस्ट २००३ पूर्व शहर विभाग
स्वामी सुबोधनंद शाखा २८ जुलै १९९३ कर्वे नगर
स्वामी शिवानंद शाखा १५ जुलै २०११ पद्मवती विभाग
स्वामी योगानंद शाखा १४ नोव्हेंबर १९९७ पूर्व शहर विभाग
स्वामी विवेकानंद शाखा ०४ जुलै १९८२ गोखले नगर
स्वामी ब्रह्मानंद शाखा ०१ ऑगस्ट २००३ सिंहगड रस्ता
नरवीर तानाजी मालुसरे शाखा १० डिसेंबर २०११ सिंहगड रस्ता
समर्थ रामकृष्ण शाखा १३ मे १९७९ पूर्व शहर विभाग
स्वामी अखंडानंद शाखा १० ऑक्टोबर १९८६ बिबवेवाडी विभाग
स्वामी अभेदानंद शाखा २३ ऑक्टोबर १९९७ गोखले नगर
भगिनी निवेदिता शाखा ०१ जून १९७९ वर्धिका विभाग
राजर्षी शाहू महाराज शाखा ०८ डिसेंबर २००८ कर्वे नगर
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाखा २५ जुलै २०१३ वर्धिका विभाग
धर्मवीर शंभुराजे शाखा १० डिसेंबर २०११ पद्मवती विभाग
वीर अभिमन्यु बालशाखा ०१ ऑगस्ट १९९२ पूर्व शहर विभाग
स्वामी दयानंद सरस्वती शाखा १३ जुलै २००३ बिबवेवाडी विभाग


संस्थेचे उपक्रम

[संपादन]

संस्थेतर्फे प्रकाशित झालेली पुस्तके

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]

अधिक माहितीसाठी

[संपादन]

संस्थेचे संकेतस्थळ: https://www.swaroopwardhinee.org/

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. https://swaroopwardhinee.org/founder/. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. "'Swa'-Roop Wardhinee". www.swaroopwardhinee.org. 2019-06-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-16 रोजी पाहिले.
  3. "Kishabhau Patvardhan - Not Just A Teacher But A Transformer!". Sewagatha (हिंदी भाषेत). 2025-09-13 रोजी पाहिले.