Jump to content

रक्सौल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रक्सौल
मोठे शहर
देश भारत ध्वज India
राज्य बिहार
जिल्हा पूर्व चंपारण्य
Elevation
६८ m (२२३ ft)
लोकसंख्या
 (2011)
 • एकूण ५५,५३७ (रक्सौल नगर परिषद)[]
भाषा
 • अधिकृत हिंदी, भोजपुरी
वेळ क्षेत्र UTC+5:30 (IST)
पिन
८४५ ३०५
टेलिफोन कोड ०६ २५५
आयएसओ ३१६६ कोड IN-BR
लोक सभा मतदारसंघ पश्चिम पंचारण्य
विधानसभा मतदारसंघ रक्सौल
संकेतस्थळ eastchamparan.bih.nic.in

रक्सौल हे बिहार राज्यातील पूर्व चंपारण जिल्ह्यातील एक उपविभागीय शहर आहे. हे बीरगंज (नेपाळ)च्या समोरील भारत-नेपाळ सीमेवर वसलेले आहे. रक्सौल हे एक प्रमुख रेल्वे टर्मिनस आहे. रक्सौल हे भारतीय सीमावर्ती शहर अवजड वाहतुकीसाठी सर्वाधिक व्यस्त शहर आहे. बीरगंजच्या एकूण उत्पादनांपैकी जवळपास ५६% उत्पादने या मार्गाने भारतातील बिहार राज्यात निर्यात केली जातात.

लोकसंख्याशास्त्र

[संपादन]

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार,[] रक्सौल बाजारची लोकसंख्या ५५,५३२ आहे. यात ५४% पुरुष आणि ४६% महिला आहेत. रक्सौल बाजाराचा सरासरी साक्षरता दर ७५.६२% आहे. बिहार राज्याचा सरासरी साक्षरता दर ६१.८०% आहे. पुरुष साक्षरता दर ८२.१४% आणि महिला साक्षरता दर ६८.२५% आहे. रक्सौल बाजारात १६.२१% लोकसंख्या ही ६ वर्षाखालील आहे. लोक भोजपुरी आणि हिंदी भाषांमध्ये एकमेकांशी संवाद साधतात. येथे ८२.७% हिंदू, १६.१६% मुस्लिम आणि १.१४% इतर धर्माचे लोक राहतात []

इतिहास

[संपादन]

रक्सौलमधील सर्वात जुने गाव म्हणजे कनाना गाव आहे. रक्सौलच्या सर्वात जुन्या ज्ञात नावांपैकी एक कनाना पुरुशोत्तमपुर आहे.

वाहतूक

[संपादन]

रक्सौल हे एकमेव शहर आहे जे नेपाळशी जोडलेले आहे. बीरगंज रेल्वे स्थानक नेपाळ सरकार रेल्वे (एनजीआर) द्वारे बिहारच्या रक्सौल स्थानकास बिहारच्या सीमेपलिकडे जोडले गेले आहे. हा रेल्वेमार्ग उत्तरेस ४७ किलोमीटर (२९ मैल) नेपाळमधील अमलेखगंज पर्यंत आहे. हे ब्रिटिशांनी इ.स. १९२७ मध्ये बांधले होते परंतु डिसेंबर १९६५ मध्ये बीरगंजच्या पुढे ते बंद करण्यात आले. रक्सौल ते बीरगंज पर्यंतचे अंतर ६ किलोमीटर (३.७ मैल) आहे. भारतीय रेल्वेने रक्सौलमध्ये ब्रॉडगेज टाकल्यानंतर दोन वर्षांनी या मार्गाचे देखील ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण केले. आता, ब्रॉडगेज रेल्वे मार्ग रक्सौलला सिरसिआ (बिरगंज) इनलॅंड कंटेनर डेपो (आयसीडी) शी जोडतो. हे काम २००५ मध्ये पूर्णपणे कार्यक्षम झाले. नेपाळमधील बिरगंज ते अमलेखगंज या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून तो मार्ग पुन्हा सुरू करण्याबाबत बोलणी चालू आहेत. हा मार्ग सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.

रेल्वे

[संपादन]

रक्सौल जंक्शन रेल्वे स्थानक दिल्ली - गोरखपूर - रक्सौल - चकिया - मुझफ्फरपूर - कोलकाता मार्गावर आहे. दररोजच्या प्रवासी गाड्यांमार्फत रक्सौल बिहारमधील अनेक शहरांशी जोडलेले आहे. मुझफ्फरपूर, सुगौली, चकिया, बैरगानिया आणि सीतामढीसाठी दिवसातून अनेक गाड्या वर-खाली करतात. बागहा, हाजीपूर, समस्तीपूर, मोतीहारी आणि नरकटियागंज या ठिकाणी जाण्यासाठी दिवसातून एक गाडी उपलब्ध आहे. दररोज एक्स्प्रेस गाड्या गोरखपूर आणि बरेलीसह उत्तर प्रदेशातील प्रमुख शहरांमध्ये थांबासह दिल्लीला जोडतात. कोलकाता देखील दैनिक एक्स्प्रेस ट्रेनने जोडलेले आहे सुद्धा ट्रेन १३०२१ ही हावडा रक्सौल मिथिला एक्स्प्रेस आहे. थेट लखनौ आणि वाराणसी (उत्तर प्रदेशमधील) यांना जोडणारी ट्रेन इतर अनेक शहरांमध्ये थांबत जाते. छपरा, पाटणा, चकिया, जबलपूर, मुंबई, दरभंगा, बरौनी, धनबाद, बोकारो, रांची, राउरकेला, बिलासपूर, रायपूर, नागपूर आणि हैदराबाद देखील साप्ताहिक किंवा अनेक साप्ताहिक गाड्यांद्वारे जोडलेले आहेत. दिल्ली सत्याग्रह एक्स्प्रेस आणि सद्भावना एक्स्प्रेस मार्गे जोडली गेली आहे. पूर्वी, सर्व ट्रॅक मीटर गेज होते परंतु सध्या बहुतेक १,६७६ मिलीमीटर (५.४९९ फूट) ब्रॉड गेजमध्ये रूपांतरित झाले आहेत. दरभंगा ते सीतामढी मार्गे रक्सौल ते ब्रॉड गेज मध्ये रूपांतरण पूर्ण झाल्यानंतर मार्च २०१४ पासून रक्सौलकडे जाणारा आणखी एक ब्रॉडगेज मार्ग उपलब्ध झाला. रक्सौल ते नरकटियागंज हा मीटर गेज ट्रॅक ऑगस्ट २०१८ मध्ये ब्रॉड गेज मध्ये रूपांतरित झाला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ http://www.census2011.co.in/data/town/801282-raxaul-bazar-bihar.html
  2. ^ "Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. 2004-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-01 रोजी पाहिले.
  3. ^ "Census of India – Socio-cultural aspects". Government of India, Ministry of Home Affairs. 20 मे 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 मार्च 2011 रोजी पाहिले.