Jump to content

गोल खो-खो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोल खो-खो हा एक महाराष्ट्रभारतातील अन्य राज्यांमध्ये प्रचलित असलेला एक मैदानी खेळ आहे.

क्रीडांगण

[संपादन]

३.२५ – ३.६५ – ६.७० मीटर (वर्तुळ)

खेळाचे स्वरूप व नियम

[संपादन]

दोन्ही संघाचे प्रत्येकी १२ खेळाडू असतात - यांपैकी ९ खेळाडू प्रत्यक्ष सामन्यात उतरवले जातात, तर ३ खेळाडू राखीव असतात.

याच्या सामन्यात प्रत्येकी ५ मिनिटांचे २ डाव असतात. प्रत्येक संघावर दोन वेळा पाठलाग दोन वेळा पळती करायची पाळी येते. नाणेफेक जिंकणारा संघ पळती किंवा पाठलाग घेतो. पळती आलेल्या संघातील पळणारा खेळाडू आपल्याच संघातल्या अन्य खेळाडूच्या पाठीला पाठीकडून हात लावून खो देतो. खो मिळालेल्या खेळाडूस आपले तोंड ज्या दिशेने (आत/बाहेर) आहे, त्याच दिशेने पळावे लागते. पाठलाग करणाऱ्या संघाच्या खेळाडूने बाहेरच्या वर्तुळात धावणाऱ्या पळतीवरच्या संघाच्या खेळाडूस स्पर्श केल्यास पळतीवरचा तो विवक्षित खेळाडू बाद धरला जातो व त्यास मैदान सोडावे लागते. पळतीवरच्या संघाचा प्रत्येक बाद होणाऱ्या खेळाडूगणिक पाठलागावरच्या संघास १ गुण दिला जातो. निर्धारित वेळेत सर्वाधिक गुण मिळविणारा संघ सामन्यात विजयी ठरतो.