Jump to content

एडिथ पियाफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एडिथ जोवाना गास्यॉं (एडिथ पियाफ)
जन्म १९ डिसेंबर, इ.स. १९१५
बेलव्हिल, फ्रान्स
मृत्यू ११ ऑक्टोबर, इ.स. १९६३
प्लासासिये, फ्रान्स
टोपणनावे ला मोम पियाफ
नागरिकत्व फ्रेंच
पेशा गायिका, गीतकार, अभिनेत्री


एडिथ पियाफ उर्फ एडिथ जोवाना गास्यॉं'(फ्रेंच: Édith Piaf;)(१९ डिसेंबर, इ.स. १९१५ - ११ ऑक्टोबर, इ.स. १९६३) ही एक फ्रेंच गायिका होती. ती फ्रान्सातील एक नामवंत कलाकार म्हणून ओळखली जाते. तिच्या गायनात तिच्या आयुष्याचे पडसाद उमटलेले आढळतात. बॅले प्रकारातील गायन हे तिचे वैशिष्ट्य होते. 'ला वी ऑं रोझ', 'नो, ज न रिग्रेट रियां', 'इम्न आ लामूर', 'मिलोर्द', इत्यादी तिची गाजलेली गाणी आहेत.