नमस चंद्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्राध्यापक नमस चंद्रा ( १६ एप्रिल १९५२) हे अमेरिकेतील न्यू जर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बायोमेडिकल इंजिनिअरींगचे प्राध्यापक आहेत [१]. त्यांनी भारतात अण्णा विद्यापीठातून बी.ई तर अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ ह्यूस्टनमधून एम.एस तर टेक्सास ए ऍन्ड एम युनिव्हर्सिटीतून पी.एच.डी या पदव्या मिळविल्या. ते १९८६ ते २००६ या काळात फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये, २००६ ते २०१२ या काळात युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का ऍट लिंकन येथे तर २०१२ पासून न्यू जर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "न्यू जर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संकेतस्थळावरील नमस चंद्रा यांची माहिती". Archived from the original on 2014-11-19. 2014-12-30 रोजी पाहिले.