महादेव लक्ष्मण डहाणूकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महादेव लक्ष्मण डहाणूकर हे उद्योगपती तसेच मुंबईचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले नगरपाल होते. मुंबईच्या 'पार्ले टिळक कॉमर्स कॉलेज'ला(स्थापना इ.स. १९६०) डहाणूकरांनी मोठी देणगी दिली. त्यावरून त्या कॉलजचे नाव बदलून ते इ.स. १९६२मध्ये, एम.एल. डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स तथा डहाणूकर कॉलेज असे करण्यात आले.