Jump to content

रिव्हर्स रेपो दर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रिव्हर्स रेपो दर म्हणजे ज्या व्याज दराने, त्याचे अखत्यारीतील बँका, रिझर्व्ह बँकेकडे पैसे ठेवतात तो दर असतो.यामध्ये रेपो दराचे वाढण्यावर अथवा कमी होण्यावर फरक पडतो व तो सहसा, रेपो दरावर अवलंबून असतो.

रिव्हर्स रेपोदराचे प्रकार -: रिव्हर्स रेपोदराचे दोन प्रकार पडतात

१) स्थिर रिव्हर्स रेपोदर - हा दर स्थिर असून यापेक्षा जास्त दराने लिलाव होत नाहीत. रिव्हर्स रेपो  व्यवहारही १ ते ५६ दिवस मुदतीचे असतात . २७ एप्रिल २००१ला स्थिर रिव्हर्स रेपोदर ६.७५% होता .३ मे २०११ पर्यंत स्थिर रेपोदर आणि स्थिर रिव्हर्स रेपो दर घोषित करत असताना त्यांच्यातील अंतराचे विशिष्ट सूत्र नव्हते , ३ मे २०११ पासून स्थिर रेपोदर जाहीर करत असत आणि त्यापेक्षा १०० बेसिस पॉईंट्स म्हणजे १% अंतर ठेवून स्थिर रिव्हर्स रेपोदर समजला जात असे , याआधी हे अंतर ३% पर्यंतही पोहचले आहे .२९ सप्टेंबर २०१५ च्या धोरणापर्यंत हे अंतर १% राहिले. म्हणजे स्थिर रेपोदर ६.७५% आणि स्थिर रिव्हर्स रेपोदर ५.७५% होता. २ एप्रिल २०१६ च्या धोरणाने हे अंतर ०.५%च ठेवले आहे . म्हणजे स्थिर रेपोदर ६.५% आणि स्थिर रिव्हर्स रेपोदर ६% केला आहे . हे अंतर जास्त कमी होत असले, तरी स्थिर रिव्हर्स रेपोदर हा स्थिर रेपोदराशी (प्रधान व्याजदराशी ) जोडण्यात आला आहे ,बँकाकडील अल्पकालीन अतिरिक्त तरलता वापरणे आणि ती उत्पादक बनविणे हा रिव्हर्स रेपो व्यवहारामागील उद्देश आहे. बँका कमावत असलेल्या या व्याजदराचे संकेत बाजारात पाठविणे रिव्हर्स रेपो व्यवहारांचा उद्देश आहे.

२) तरता रिव्हर्स रेपोदर - हे व्यवहार वरील पद्धतीचे असतात .परंतु यातील रिव्हर्स रेपोदर अनित्य असतो. म्हणजे जसे २ एप्रिल २०१६ पासून स्थिर रिव्हर्स रेपोदर ६% आहे . तर १ जून २०१६ च्या लिलावात तरता रिव्हर्स रेपोदर ६.४९%  होता. २ जून २०१४ पासून तरता  रिव्हर्स रेपोदरावर आधारित लिलाव केले जातात . 

हे सुद्धा पहा

[संपादन]