पेटारी
Appearance
पेटारी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
स्थानिक नाव : पेटार, पेटारी, पेटारा
शास्त्रीय नाव : Trewia polycarpa Bth
इंग्रजी नाव : False White Teak
संस्कृत नाव : पिण्डारः
कूळ : Euphorbiaceae
उपयोगी भाग : पिकलेले फळ
उपलब्धीचा काळ : पिकलेले फळ:- मार्च- मे
झाडाचा प्रकार : झाड
अभिवृद्धी : बिया
वापर : पिकलेले फळ
आढळ
महाराष्ट्रातील बहुतेक जंगलांमध्ये पेटारचे पानझडी झाड वाढलेले दिसते. ठाणे, पालघर, नाशिकच्या आदिवासी भागात,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर पश्चिम घाटातील पुणे, कोल्हापूरच्या जंगलात, माळरानावर तसेच डोंगरकपारीला पेटारची झाडे वाढलेली दिसतात.
वनस्पतीची ओळख
[संपादन]- पेटारचे झाड साधारण १० ते २० मीटर उंच वाढते. झाडाची साल मऊ, तपकिरी करड्या रंगाची असून सालीच्या आतील भाग पिवळसर पांढरा असतो.
- सालीचा कोवळा भाग लवदार असतो. पाने साधी, गडद हिरव्या रंगाची, मऊसर लव असणारी तर कोवळी पाने तपकिरी रंगाची असतात.
- पाने हृदयाच्या आकाराची व टोकाशी निमूळती, शिरायुक्त असतात. पेटारची पाने ७ ते १७ सें.मी. लांब व ७ ते १० सें.मी. रुंद. देठ ३ ते ७ सें.मी. लांब. पानाच्या कडा दातेरी असतात. फुले अनेक, एकलिंगी, फिक्कट हिरव्या रंगाची व ३ ते १२ सें.मी. लांब पुष्पगुच्छ्यात येणारी असतात. नर फुले ४ ते ५ मिमी. लांब व ७ ते २० सें.मी. लांब पुष्पगुच्छ्यात येणारी तर मादी फुले ५ ते ९ मिमी. लांब व लांब दांड्यावर येणारी असतात.
- फळे गोल, २ ते ३ सें. मी. व्यासाची, कठीण कवच असणारी, किवा लवयुक्त, हिरवी पण लालसर छटा असणारी असतात. फळाचा गाभा ३ ते ४ भागात विभागलेला असतो. गर पांढरा व गोल बियामध्ये लगडलेला असतो. पेटारची फुले डिसेंबर ते मार्चपर्यंत येण्यास सुरुवात होते. तर मार्च ते मेपर्यंत पिकलेले फळे खाण्यासाठी तयार होतात.
औषधी उपयोग
[संपादन]- पेटारची साल व पाने औषधात वापरली जातात. सालीचा काढा करून, गाळून तो पोटदुखीवर पिण्यास दिला जातो.
- पाने जाळून त्याची राख मूळव्याधीवर लावण्यासाठी वापरली जाते. स्थानिक भाषेत त्याला ‘मिसरी’ असे म्हणतात.
- इतर उपयोग : पेटारची पिकलेली फळे खाण्यासाठी वापरली जातात.
- फळांचा गर अतिशय मधुर, रुचकर व शीतल असतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |