वल्लभभाई पटेल साहित्य संमेलन
जुनी सांगवी(पुणे) येथील सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानच्या वतीने शिर्डी(अहमदनगर जिल्हा) येथे एकदिवसीय ’सरदार वल्लभभाई पटेल साहित्य संमेलन’ २२ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष बबन पोतदार होते. त्यांच्या बीजभाषणानंतर संमेलनात, ’संत महात्म्यांच्या अध्यात्माचे विचार आणि आजचा युवक’ या विषयावर परिसंवाद, आणि धनंजय सोलकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. पुरस्कार वितरण समारंभ व आभार प्रदर्शनानंतर संमेलन संपले.
त्यानंतरचे पुढले वल्लभभाई पटेल साहित्य संमेलन पाचगणी येथे २१-४-२०१३ला होणार होते, झाले की नाही ते माहीत नाही.. संमेलनाच्या अध्यक्षपदी पिंपळे गुरव (पुणे) येथील लेखक सुरेश कंक हे असणार होते. सुरेश कंक हे पथनाट्याद्वारे एड्सविषयक प्रबोधन करतात. त्यांचे ’एड्सला प्रतिबंध’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यांना महाराष्ट्र सरकारचा गुणवंत कामगार पुरस्कारही मिळाला आहे.
पहा : मराठी साहित्य संमेलने